“ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये…”, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

काही अधिकाऱ्यांनी ही सुपारी घेतली होती. पण त्यांना ते करता आले नाही. कारण अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करण्यास नकार दिला", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये..., देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 3:43 PM

Devendra Fadnavis Allegation Mahavikasaaghadi Government : महाविकासआघाडी सरकारच्या काळात माझ्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नागपुरात बोलत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला दुजोरा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला अटक करण्याच्या संदर्भात किंवा भाजप नेत्यांना अटक करण्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत सत्य आहे. खोट्या केसेस करुन मला कशी अटक करता येईल, याचे षडयंत्र झालं. पण या सर्व षडयंत्रांचा आम्ही त्यावेळी पर्दाफाश करु शकलो. त्याचे व्हिडीओ पुरावेही आम्ही सीबीआयला दिले. आजही आमच्या जवळ याचे काही पुरावे आहेत”, असे खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

खोट्या केसेस दाखल करण्यास नकार दिला

“महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांसारख्या अनेक नेत्यांना अक्षरश: जेलमध्ये टाकण्याची सुपारी देण्यात आली होती. काही अधिकाऱ्यांनी ही सुपारी घेतली होती. पण त्यांना ते करता आले नाही. कारण अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करण्यास नकार दिला”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांबद्दल एक मोठं विधान केलं. सध्या त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी सिल्व्हर ओकवर स्वतः शरद पवारांनी बैठक बोलावली होती. तसेच याबद्दल मातोश्रीवरही बैठक पार पडली, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी केला होता.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.