खा. कोल्हे म्हणाले, अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय, फडणवीस म्हणाले, ‘स्वप्न बघायला…’
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कुणीही पाहू शकतं. परंतु या तिन्ही पक्षात समन्वय नाही हे मी आधीपासून सांगत आलोय. त्यांच्या मधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होतायत, अशी तिरकस कमेंट फडणवीस यांनी केली.
नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेलं मला पाहायचं आहे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली. कोल्हेंनी इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीतूनही काही प्रतिक्रिया आल्या. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलंय. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदावर भाष्य करताना त्यांनी तिरकस कमेंट केली आहे.
फडणवीसांची तिरकस कमेंट
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कुणीही पाहू शकतं. परंतु या तिन्ही पक्षात समन्वय नाही हे मी आधीपासून सांगत आलोय. त्यांच्या मधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होतायत, अशी तिरकस कमेंट फडणवीस यांनी केली.
फडणवीसांचा सल्ला, जनतेसाठी स्वप्न बघा
यांच्यात समन्वय नाही, इथपर्यंत ठीक आहे पण यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेला त्रास होतोय, त्याचं काय?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसंच जाताजाता जनतेसाठी स्वप्न बघा, असं सांगायला फडणवीस विसरले नाहीत.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
खासदार अमोल कोल्हे सभा गाजविणारे वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. कुठलाही मुलाहिजा न बाळगता आपल्या मनातील भावना ते व्यक्त करत असतात. अनेकवेळा राजकीय फटकेबाजीच्या माध्यमातून ते विरोधकांवर तसंच स्वपक्षीयांनाही डोस पाजत असतात. भोसरीमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा केली.
कोल्हेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचे मत शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या. अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर इथल्या नेत्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता इथे ताकत वाढवली पाहिजे, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा :