फडणवीस दिल्ली दरबारी, अमित शाहांशी अर्धा तास चर्चा

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती आहे.

फडणवीस दिल्ली दरबारी, अमित शाहांशी अर्धा तास चर्चा
Follow us
| Updated on: Nov 04, 2019 | 12:35 PM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ फडणवीस आणि शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यातील दुष्काळाची माहिती यावेळी फडणवीसांनी शाहांना (Devendra Fadanvis meets Amit Shah) दिली. अमित शाहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी शाहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती आहे. यावर, जास्तीत जास्त मदत करण्याचं आश्वासन शाहांनी दिलं.

दरम्यान, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, शिवसेनेचा 50-50 फॉर्म्युला आणि उपमुख्यमंत्रिपद यासारख्या अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाव्य शपथविधीवरही टांगती तलवार, सहा तारखेचा मुहूर्त लांबणीवर?

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बारा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संभाव्य शपथविधीवरही टांगती तलवार आहे. शपथविधी सहा तारखेला होणार असल्याची चर्चा असतानाच आता हा मुहूर्तही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, दिल्लीतच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट होत आहे. तसंच सत्तास्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा शब्द शिवसेनेला भाजपने कधीच दिला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरु असलेली बोलणी फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

Devendra Fadanvis meets Amit Shah

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.