शिवसेनेचे 18, भाजपचे 24, फडणवीसांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी व्हायरल
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या या व्हायरल यादीनुसार शिवसेनेच्या वाट्याला दहा-बारा नव्हे तर तब्बल 18 मंत्रिपदं आली आहेत
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. फडणवीसांच्या शपथविधीचा मुहूर्तही ठरत आहे. हे सगळं अगदी अपेक्षित होतं, मात्र मंत्रिमंडळाची संभाव्य यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Devendra Fadanvis Ministry Viral List) झाली आहे. ही नावं वाचून तुमची बोटंही तोंडात जातील.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या या व्हायरल यादीनुसार शिवसेनेच्या वाट्याला दहा-बारा नव्हे तर तब्बल 18 मंत्रिपदं आली आहेत. त्यातही जी नावं आहेत ती आश्चर्याचा धक्का देणारी आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे अशी विद्यमान किंवा दिग्गज नेत्यांची नावं या यादीत आहेतच पण मनिषा कायंदे, रमेश प्रभू, बच्चू कडू अशा चेहऱ्यांचाही नव्याने मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असं ही यादी सूचित करते
शिवसेना मंत्रिमंडळाची संभाव्य व्हायरल यादी
1. आदित्य ठाकरे, मुंबई 2. रविंद्र वायकर, मुंबई 3. दीपक केसरकर, सिंधुदुर्ग 4. रामदास कदम, रत्नागिरी 5. सुभाष देसाई, मुंबई 6. दिवाकर रावते, मुंबई 7. एकनाथ शिंदे, ठाणे 8. मनिषा कायंदे, मुंबई 9. प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद 10. रमेश प्रभू, मुंबई 11. आशिष जैस्वाल, रामटेक 12. बच्चू कडू, अमरावती 13. संजय राठोड, यवतमाळ 14. गुलाबराव पाटील, जळगाव 15. डॉ. राहुल पाटील, परभणी 16. तानाजी सावंत, सोलापूर 17. ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद 18. प्रकाश आबिटकर, कोल्हापूर
भाजपच्या यादीतली काही नावंही अशीच थक्क करणारी आहेत. भाजपच्या यादीत तर तब्बल 24 नावं आहेत.
भाजप मंत्रिमंडळाची संभाव्य व्हायरल यादी (Devendra Fadanvis Ministry Viral List)
1. सुधीर मुनगंटीवार, मंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्ष 2. गिरीश महाजन, जळगाव 3. चंद्रकांत पाटील, पुणे 4. आशिष शेलार मुंबई 5. जयकुमार रावल, धुळे 6. रविंद्र चव्हाण, ठाणे 7. परिणय फुके, नागपूर 8. समीर मेघे, वर्धा 9. अशोक उइके, यवतमाळ 10. रामदास आंबटकर, वर्धा 11. मदन येरावार, यवतमाळ 12. राजेंद्र पटणी, वाशिम 13. श्वेता महाले, बुलडाणा 14. डॉ. राहुल आहेर, नाशिक 15. अतुल सावे, औरंगाबाद 16. किसन कथोरे, ठाणे 17. राहुल नार्वेकर, मुंबई 18. सुनील राणे, मुंबई 19. गीता जैन, मुंबई 20. सुरेश खाडे, सांगली 21. मेघना बोर्डीकर, परभणी 22. अभिमन्यू पवार, लातूर 23. महादेव जानकर, पुणे 24. सदाभाऊ खोत, सांगली
जशी शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी वाचून धक्का बसला असेल तसंच भाजपच्या या यादीतली नावं वाचूनही धक्का बसला असणार. पण ही यादी व्हायरल झालेल्या मेसेजमधली आहे. पण म्हणतात ना, राजकारणात काहीही शक्य आहे. त्यामुळे या यादीतल्या (Devendra Fadanvis Ministry Viral List) अशक्य चेहऱ्यांचं नशीब फळफळणारच नाही असंही नाहीच.
संबंधित बातम्या :
उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच!
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री
सत्तास्थापनेच्या हालाचालींना वेग, पुणे, सातारा, सांगलीमध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
शिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार?
मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत, साताऱ्यात तीन आमदारांची वर्णी?
शिवसेनेतील 4 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, कोकणातून कुणाची वर्णी लागणार?