Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Case to CBI | पार्थ पवारांची मागणी आजोबांना आवडली का, यावर बोलणार नाही, पण… : देवेंद्र फडणवीस

पार्थ पवारांची मागणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केलं असावं, असं फडणवीस म्हणाले.

SSR Case to CBI | पार्थ पवारांची मागणी आजोबांना आवडली का, यावर बोलणार नाही, पण... : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 1:38 PM

वर्धा : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले. याविषयी प्रश्न विचारला असता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadanvis reacts on Parth Pawar tweet after Sushant Singh Rajput Death case transferred to CBI)

“पार्थ पवार यांनी काय ट्वीट केले, ते मला माहित नाही. पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती हे खरंच आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला कमेंट करायची नाही. पण त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केलं असावं” असं फडणवीस म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे” असेही फडणवीस म्हणाले.

“आता हा निर्णय झाल्यावर सीबीआय लवकर चौकशी करेल. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना या माध्यमातून न्याय मिळेल” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधीपक्षांसोबतच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे पार्थ पवार यांना फटकारत त्यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं. यात त्यांनी “सत्यमेव जयते” इतकंच म्हटलं आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली मागणी योग्यच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी फटकारल्यानंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. त्यामुळे यावर शरद पवार आणि इतरांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.

सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी सापडला होता. सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिस कारवाई करत असताना त्याच्या वडिलांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सत्यमेव जयते ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात

मुंबई पोलिसांविरोधात षडयंत्र, सीबीआय तपासाच्या निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

(Devendra Fadanvis reacts on Parth Pawar tweet after Sushant Singh Rajput Death case transferred to CBI)

राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला.