कोकणचा आंबा गोड की लोकं? पंगा घेतला तर पुढच्या चार पिढ्या… देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आलं.

कोकणचा आंबा गोड की लोकं? पंगा घेतला तर पुढच्या चार पिढ्या... देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 11:23 AM

मुंबईः कोकणातला आंबा (Mango) गोड की लोकं? असा प्रश्न पडतो. आंबा तर गोड आहेच. लोकांबद्दल एक ऐकलंय…ते खूप सरळ आहेत. पण  कोकणातील लोकांशी जर पंगा घेतला तर त्याच्या चार पिढ्या उध्वस्त करतात, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कोकण महोत्सवात (Kokan Festival) केलं. त्यामुळे कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कोकण महोत्सवात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ कोकणी माणूस अतिशय सरळ आहे. निर्मळ आहे. पण त्याचवेळी पंगा घेतला तर घरदार विकूनही कोर्ट कज्जे करून चार पिढ्या तो थांबत नाही.

तो चांगुलपणा ही कोकणी माणसाची शिदोरी आहे. त्यामुळे चांगल्यांना अधिक चांगलं देता येईल, असा आमचा प्रयत्न आहे…

नाणार रिफायनरीविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ ज्या वेळी रिफायनरी आणली तेव्हा ती ग्रीन रिफायनरी असेल, असा आग्रह आहे. इथलं प्रदूषण वाढणार नाही.

ज्यात उत्सर्जन नाही, असं तंत्रज्ञान वापरणार आहोत. 5 हजार एकरात त्यांना फक्त ग्रीनरीही तयार करावी लागेल, असा नियम आम्ही केल्याचं फडणवीस म्हणाले.

या रिफायनरीमुळे कोकणात 1 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो. पण काही लोकांनी आरोप केला की रिफायनरीमुळे कोकणातला आंबाच येणार नाही. पण मी गुजरातला 1 नंबरची रिफायनरी आहे.

कोकणच्या आंब्याच्या खालोखाल गुजरातचा आंबा देश-विदेशात निर्यात होतो. जगभरात तो जातो. त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नकोय. त्यांना कोकण मागास ठेवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे.

त्यामुळे कोकणात रिफायनरी आम्ही करून दाखवू. कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.