Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस बदला घेणार म्हणाले होते, होळीच्या दिवशी मोठं वक्तव्य.. सगळ्यांनी तंग केलं होतं…

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक अर्थसंकल्प असेल. ज्या प्रकारे विविध रंगांनी होळी साजरी केली जाते. आपले बजेटही वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं असेल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

देवेंद्र फडणवीस बदला घेणार म्हणाले होते, होळीच्या दिवशी मोठं वक्तव्य.. सगळ्यांनी तंग केलं होतं...
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 2:07 PM

मुंबई : राज्यात होळीचा (Holi) उत्साह शिगेला पोहोचला आहे. एरवी एकमेकांवर राजकीय आगपाखड करणाऱ्या राजकारण्यांनी आज बोचऱ्या टीका केल्या. आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपने (Mumbai BJP) यंदा दिमाखदार होळी साजरी केली. बांद्र्यात भाजपतर्फे होळी आयोजित करण्यात आली होती. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज, तसेच इतर भाजप नेत्यांनी विशेष होलिकोत्सवाचं आयोजन केलं होतं. भाजप नेत्यांनी यावेळी मनसोक्त गुलालाची उधळण करत होळी खेळली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला होळीनिमित्त संदेश दिला. विरोधकांचा बदला घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं. तसेच संजय राऊत यांच्यावरही खोचक टीका केली.

विरोधकांचा बदला…

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं होतं. मी बदला घेणार. आजही त्यांनी या वक्तव्याची आठवण केली. ते म्हणाले, खूप लोकांनी तंग केलंय. मी स्वतः विधानसभेत म्हटलं होतं, बदला घेणार. तो बदला म्हणजेच मी सगळ्यांना माफ केलंय. आमच्या मनात काहीच कटूता नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय.

शिमगा फक्त एकच दिवस…

संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. एखाद दिवस ठिक आहे. उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम…

नशा कशाचा करावा?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही मित्रांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजून दिली होती. त्यानंतर त्यांच्यापैकी दिवसभर कुणी गाणं म्हणत होतं. कुणी बोलत सुटले होते. पण असा नशा करण्यापेक्षा भक्ती, संगीत, कामाचा नशा करावा….

विविधरंगी अर्थसंकल्प

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक अर्थसंकल्प असेल. ज्या प्रकारे विविध रंगांनी होळी साजरी केली जाते. आपले बजेटही वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं असेल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना वेळीच मदत केली जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.