Fadnavis Tweet On Pawar : हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसचे सलग 14 ट्विट, वाचा सविस्तर

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.

Fadnavis Tweet On Pawar : हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसचे सलग 14 ट्विट, वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीस, शरद पवारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 4:54 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याची सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे नास्तिक आहेत, ते क्वचितच एखाद्या मंदिरात दिसतील असं वक्तव्य राज यांनी केलं. इतकंच नाही तर शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाचं विष पसरवल्याचा गंभीर आरोपही राज यांनी केला. राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत प्रबोधनकार ठाकरेच आपले आदर्श असल्याचा टोला लगावलाय. दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये हिंदू दहशतवाद, कलम 370, इशरत जहाँ अशा अनेक मुद्दे उपस्थित कतर पवारांवर टीका केलीय. जातीय ध्रुवीकरणासाठी पवारांकडून विशिष्ट समाजाचं लांगूलचालन केलं जात असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय. इतकंच नाही तर फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांच्या विविध वक्तव्ये आणि त्याच्या बातम्यांच्या लिंक दिल्या आहेत.

फडणवीसांचे ट्वीट आणि पवारांवर हल्लाबोल

  1. एकीकडे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. ते जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 च्या विरोधात होते. पण डॉ. आंबेडकरांची इच्छा आणि मूल्यांविरोधात काय बोललं गेलं ते पाहा.
  2. आम्ही द काश्मिर फाईल्सबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विविध वक्तव्ये ऐकत आहोत आणि ते आश्चर्यकारक नाहीत. किंबहुना ते राष्ट्रवादीच्या तुष्टीकरण धोरण आणि राजकारणाच्या आणि जातीच्या आधारावर ध्रुवीकरण करण्याच्या जुन्या ट्रॅक रेकॉर्डशी सुसंगत आहे.
  3. इथे एक उदाहरण आहे, त्यांनी आपले मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत सांगितलं होतं. जे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात जेलमध्ये आहेत. नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असं वक्तव्य पवारांनी केलं होतं. त्याचा धागा पकडत फडणवीसांनी हे ट्वीट केलंय. इशरत जहाँ निर्दोष असल्याचं वक्तव्य पवारांनी 2013 मध्ये केलं होतं आणि ते रेकॉर्डवर आहे.’
  4. इशरत जहाँ निर्दोष आहे इतकंच पवार म्हणाले नाहीत, तर त्यांनी तिला मदतीचा हात पुढे केला आणि स्वत: सत्तेत असताना त्यांनी आयबीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
  5. 2012 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात असताना मुंबईच्या मध्यभागी आझाद मैदानावर लाजिरवाणा हिंसाचार घडला. अमर जवान ज्योतीची विटंबना झाली. पण गृहखात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं रझा अकादमीबाबत मवाळपणा दाखवत केवळ मुंबईचे पोलीस आयुक्त बदलले.
  6. आपल्या राज्यघटनेत तरतूद नसतानाही महाराष्ट्रात मुस्लिम कोटा आणण्याची भव्य योजना तयार केली गेली. वोट बँकेचं राजकारण संवैधानिक मूल्यांवर कसं वरचढ ठरतं हे लाजीरवाणं आहे.’
  7. अजून एक वक्तव्य, ‘कुणाला पराभूत करायचं ते अल्पसंख्याक ठरवतात’ अशा भडकावू वक्तव्यांना आपल्या राजकारणात काही स्थान असावं का?
  8. आणि हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करणारा व्यक्ती कोण होता आचा अंदाज बांधा
  9. राजकीय पक्षांनी सुधारणांची अंमलबजावणी केली तर ते आदर्श आहे. पण ते म्हणतात आधी सच्चर समिती लागू करा !
  10. मुंबई रडली तेव्हा काय झालं? 12 मार्च 1993 रोजी मुंबई 12 बॉम्बस्फोटांनी हादरली होती. तेव्हा शरद पवार यांनी एका मुस्लिम भागात 13 व्या स्फोटाचा शोध लावला. कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी तुष्टीकरण हे त्यांचं पहिलं प्राधान्य होतं.
  11. जातीय सलोख्याची अपेक्षा असताना असा दुटप्पीपणा का? काश्मिरी पंडितांच्या दु:खाच्या खऱ्या दाखल्यावर आधारित चित्रपट कुणाला का अस्वस्थ करतो? फक्त हे छद्म धर्मनिरपेक्ष अजेंड्याला शोभत नाही म्हणून
  12. द काश्मीर फाईल हा चित्रपट कोणत्याही धर्माविरोधात नाही तर त्यांच्याविरोधात आहे ज्यांनी तिथे लोकांना त्रास होत असताना दुसरीकडे पाहणे पसंत केले. कारण त्यांना वाटलं की हे त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकीय अजेंड्याच्या अनुकुल आहे. ज्यामुळे जातीय फूट पाडलं जाते.
  13. असं कृत्य आणि समाजाला त्रास देणारे मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात स्वीकारले जाऊ शकत नाहीत.

इतर बातम्या : 

Muktibhoomi Yeola | मुक्तीभूमी येवल्यात 15 कोटींची कामे होणार; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी फुटला नारळ

James lane Controversy: पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मनसेच्या मागणीनं वाद पेटला, पुरंदरेंनी ऑक्सफर्ड प्रेसला लिहिलेलं निषेध पत्रही सादर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.