Devendra Fadnavis: Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, फडणवीस-शिंदेंचा आजच शपथविधी होण्याची शक्यता, एवढी घाई का?
एकनाथ शिंदे म्हणतील तोच नेता आणि तोच पक्ष ही बंडखोर आमदारांची भूमिका असली तरी ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथविधी घेतील असा अंदाज आहे. मंत्रीपादाचे सूत्र चित्र स्पष्ट असले तरी आमदारांची नाराजी होऊ नये म्हणून मुंबईत दाखल झालेल्या शिंदे यांनी थेट देवेंद्र फडवणवीस यांचा सागर बंगला जवळ केला होता.
मुंबई : राज्याचे राजकारण आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. (Shivsena) शिवसेनेतील आमदारांनी पुकारलेले बंड आणि (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांची भूमिका ही आता साध्य होतानाचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ भाजप गोटातच हालचाली वाढल्या असे नाही तर गेल्या 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले एकनाथ शिंदे हे देखील झेड सुरक्षा कवचामध्ये राज्यात दाखल झाले आहेत. मात्र, ते केवळ राज्यपालाची भेटच घेणार असे नाही तर (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे शपथविधी देखील उरकून घेतील अशी स्थिती आहे. गेल्या 10 दिवसांपासून बंडखोर आमदार हे राज्याबाहेर आहेत शिवाय मंत्री पदाला घेऊन कुणामध्ये नाराजी पसरु नये शिवाय सत्तेचे समीकरकण स्पष्ट झाल्यानंतर मंत्री पदाच्या वाटाघाट्या सोईस्कर व्हाव्यात म्हणून मुंबईत दाखल झालेले शिंदे हे थेट शपथविधीच उरकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बंडखोरांची एकजूट ठेवण्यासाठी प्रयत्न
एकनाथ शिंदे म्हणतील तोच नेता आणि तोच पक्ष ही बंडखोर आमदारांची भूमिका असली तरी ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथविधी घेतील असा अंदाज आहे. मंत्रीपादाचे सूत्र चित्र स्पष्ट असले तरी आमदारांची नाराजी होऊ नये म्हणून मुंबईत दाखल झालेल्या शिंदे यांनी थेट देवेंद्र फडवणवीस यांचा सागर बंगला जवळ केला होता. कोण मंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली असून राज्यपालांची भेट घेतल्यानंतरच सर्वकाही स्पष्ट बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मंत्री पदावरुन उत्सुकता शिघेला
बंडखोर आमदार हे हिदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणार असले तरी मंत्री पदाबाबत प्रत्येकाच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. पण याबाबत नावे जाहीर झाली तर नाराजांची संख्या वाढेल आणि ऐनवेळी धोका निर्माण होईल म्हणून प्रत्येक पाऊल आता काळजीपूर्वक टाकले जात आहे. त्यामुळे सुरवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन पुन्हा मंत्रीमंडळाचा विस्तार अशी रणनिती आहे.
मंत्री पदासाठी ‘वेट अॅण्ड वॉच’
एकनाथ शिंदे हा शिवसेनेतील बंडांचा गट आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी कोण कुठल्या स्थराला जाईल हे आताच सांगता येणार नाही शिवाय त्याबद्दलची नाराजी ही भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना न परवडणारी आहे. त्यामुळे योग्य ती रचना करुन यांनी शपथविधीची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आगोदच पक्षातील आमदारांना मंत्री पदाबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’ या भूमिकेत राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जूळवून तर आले पण ऐन वेळी बिघाडी होऊन नये म्हणून राज्यपाल यांना पत्र द्यायला गेल्यावरच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेतील.