आमचे मार्गदर्शक…. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ ट्विटची चर्चा
आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. | Balasaheb Thackeray birth anniversary
मुंबई: हिंदुत्व आणि शुद्ध भगवा या मुद्द्यांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray birth anniversary) केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’, असा केला आहे. त्यामुळे आता भगव्यापाठोपाठ आता भाजप बाळासाहेबांच्या वारश्यावरही आपला हक्क सांगणार का, अशी शंका उत्पन्न झाली आहे. (politcal leaders pay tribute on Balasaheb Thackeray birth anniversary)
दरम्यान, आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ! pic.twitter.com/UZVGB7NdnA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
Tributes to Shri Balasaheb Thackeray Ji on his Jayanti. He was unwavering when it came to upholding his ideals. He worked tirelessly for the welfare of people.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
Balasaheb Thackeray ji is remembered for his courage, fearless leadership and remarkable contribution to India’s public life. My heartfelt tributes to him on his jayanti.
— Rajnath Singh (@rajnathsingh) January 23, 2021
‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग 30 बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. 50 वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं, असं संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकाच व्यासपीठावर
राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज लोकार्पण होत आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर दिसणार आहेत.
संबंधित बातम्या:
Balasaheb Thackeray Statue | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकाच व्यासपीठावर
मराठी माणूस ते हिंदुत्व, शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये काय काय बदललं?
(politcal leaders pay tribute on Balasaheb Thackeray birth anniversary)