Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा झिरवळांना मिश्किल सवाल

सभागृहाचे कामकाज सुरु असताना विधानसभेचे काळजीवाहू अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक सूचना वाचली. | Devendra Fadnavis asks Narhari zirwal

अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा झिरवळांना मिश्किल सवाल
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये बुधवारी सभागृहात घडलेल्या एका किस्स्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 12:57 PM

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session ) तिसरा दिवसही वादळी ठरताना दिसत आहे. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये बुधवारी सभागृहात घडलेल्या एका किस्स्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले. (Funny moment in Maharashtra assembly session)

सभागृहाचे कामकाज सुरु असताना विधानसभेचे काळजीवाहू अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari zirwal)  यांनी एक सूचना वाचली. त्यानुसार विधानसभेच्या सदस्यांना फास्टॅगचे (FastTAg) मोफत वाटप करण्यात येणार आहे. ही सूचना वाचताना अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरुवातीला FASTag चा उल्लेख चुकून फॉस्टिंग असा केला. सभागृहातील सदस्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी उर्वरित सूचना घाईघाईत वाचून दाखवली. विधिमंडळाच्य परिसरात आमदारांना फास्टॅग लावण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे झिरवळ यांनी म्हटले.

त्यावर हजरजबाबी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लगेच उभे राहत टिप्पणी केली. अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, हे स्पष्ट करा, असे फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

भरणेंकडून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा, फडणवीस विचारतात मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्यात राबवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्ता भरणे (Dattatreya Bharne) यांनी विधानसभेत केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लेखी उत्तर देत घोळ नसल्याचं सांगितलं आहे, मग मंत्र्यांच्या त्यांच्यावर विश्वास नाही का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वृक्ष लागवडीच्या मुद्द्यावरुन विधानसभेते घमासान पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra budget session 2021 LIVE | सरकार काळजीवाहूचं आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर

‘तो’ आमदार कोण? डीएनएवाला; प्रवीण दरेकर करणार विधानसभेत पोलखोल

(Funny moment in Maharashtra assembly session)

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...