उद्धवजी, राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा : देवेंद्र फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray and congress) यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray and congress) यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray and congress)
मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आला आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपतींचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारावा.
शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याच्या मालिकेचे सत्र सुरुच ठेवले आहे. महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. मध्यप्रदेश सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पूर्ण सन्मानाने महाराजांचं पुतळा बसवला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“काँग्रेसची राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु आहे. शिवरायांचा पुतळा तोडला, सावरकरांना अपमानित केलं. महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र शिदोरीमध्ये सावरकरांवर लेख लिहिला. सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केले आहेत. स्वातंत्रवीर नव्हे तर माफीवीर अशाप्रकारच्या लांच्छनास्पद लिखाण केलं आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमी लोकांमध्ये संताप आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेची अतूट सेवा केली. मात्र काँग्रेसने सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केलेत. काँग्रेस पार्टी हे करत असेल आणि शिवसेना केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे सहन करत असेल तर महाराष्ट्राला याचं उत्तर द्यावं लागेल. काँग्रेसने हे पुस्तक मागे घ्यावं, सावरकरांची माफी मागावी. जर मागे घेतलं नाही तर त्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सावरकरांवर गलिच्छ लिखाण करणाऱ्यांचा, बिनडोक लिखाण करणाऱ्यांचा कोणत्याही शब्दात निषेध केला तरी कमीच आहे. शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका काय? शिदोरी मासिक काँग्रेसने परत घेतले पाहिजे. मासिकावर त्वरित बंदी घातली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहणार आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.
सरकारने जर त्वरित पाऊल उचलले नाही, तर लोक हे सहन करणार नाही. ही बोटचेपी भूमिका किती दिवस चालणार आहे? सत्तेसाठी किती लाचार राहणार आहात? असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले.