…तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरु : देवेंद्र फडणवीस

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्या योजना हाती घेतल्या होत्या, त्या योजना या सरकारने पुढे नेल्या नाहीत, तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

...तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरु : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 1:03 PM

औरंगाबाद :  “मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्या योजना हाती घेतल्या होत्या, त्या योजना या सरकारने पुढे नेल्या नाहीत, तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु. दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले”, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis at Pankaja Munde agitation) यांनी दिला. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या औरंगाबादेत (Devendra Fadnavis at Pankaja Munde agitation)एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहेत. या उपोषणाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसंच भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंकजा मुंडेंचं अभिनंदन. मराठवाडा दुष्काळमुक्त करणय्चा प्रयत्न केला तो पुढं गेला पाहिजे, यासाठी लाक्षणिक उपोषण सुरु केलं. आपल्या सरकारनं घेतलेल्या योजना ठाकरे सरकारनं पुढे नेल्या नाहीत तर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभा केला जाईल”

तुम्हाला क्रेडिट हवा असेल तर घ्या, नाव बदलायचं तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे. योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू : देवेंद्र फडणवीस

सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. आत्महत्या वाढत आहे. दुष्काळ पडतोय, पाचवीला पूजलेला दुष्काळ आहे. पूर्वी आघडी सरकारनं मराठवाड्यावर अन्याय केला.  हक्काचं पाणी दिलं नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हा सरकारला इशारा दिला होता. मात्र इथलं पाणी पश्चिम महाराष्ट्र पळवून नेले. कृष्णा- मराठवाडा योजनेला त्यांनी मंजुरी दिली नाही. मात्र पंतप्रधान मोदींनी याला परवानगी दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र हे काम हे सरकार बंद करेल अशी भीती आहे, त्यामुळं उपोषण,  असं फडणवीस यांनी सांगितलं.

केवळ सात TMC नाही तर 29 TMC पाणी हवं आहे. जलयुक्त शिवार बंद करतात. क्रेडिट घ्या, मात्र ही योजना बंद करु नका. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीचा प्रयत्न केला. मराठवाड्यातील हक्काचं पाणी बाजूच्या राज्याला जात आहे. गोदावरी जल आराखडा तयार केला. 25 TMC अडविण्यासाठी धरण तयार करावं आणि या सरकारनं याला अंतिम मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. या सरकारला केवळ अंमलबजावणी करायची आहे. वॉटरग्रीड काम सुरु झालं पाहिजे. औरंगाबाद पाणी योजनेसाठी निधी मंजूर केला, मात्र या सरकारला टेंडरमध्ये रस आहे, असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आम्ही आज तुम्हाला जागरुक करायला आलो, मात्र खोडा टाकण्याचा आणि पाणी पळवण्याचा प्रयत्न केला, तर रस्त्यावर उतरु, असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.