Devendra Fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस अनिष्ट राजकारणाचे वाहक झाले आणि त्याचेच बळीही पडले!’

सध्या सुरू असलेल्या राजकारणावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस हे अनिष्ट राजकारणाचे वाहक झाले आणि त्याचेच बळीही ठरले असे म्हटले आहे.

Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीस अनिष्ट राजकारणाचे वाहक झाले आणि त्याचेच बळीही पडले!'
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 3:32 PM

सध्या सुरू असलेल्या राजकारणावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अनिष्ट राजकारणाचे (politics) वाहक झाले आणि त्याचेच बळीही ठरले असे म्हटले आहे. आवटे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोण कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. राजगोपालचारी, डॉ. सी. डी. देशमुख, मैलाना आझाद, डॉ. राजेंद्रप्रसाद, बाबू जगजीवनराम अशा तगड्या माणसांना घेऊन काम करण्याची तडफ आणि तयारी नेहरुंकडे होती. अशीच फौज होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे सुद्धा प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, शरद पवार, शशी थरूर, सलमान खर्शीद, ए. के. अँटनी, कपिल सिब्बल, ममता बॅनर्जी, विलासराव देशमुख, एस, एम कृष्णा अशी तगडी फौज घेऊन मनमोहनसिंग काम करत होते.

   महाराष्ट्राला तगड्या मंत्र्यांची परंपरा

महाराष्ट्रातही वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार किंवा सदानंद वर्दे, गणपतराव देशमुख, गोविंदराव आदिक, सुशीलकुमार शिंदे असे तगडे लोक मंत्रिमंडळात एकत्र होते. अगदी परवा-परवापर्यंत पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण अशी दणकट माणसं एकत्र काम करत होती. या महाविकास आघाडी सरकारमध्येही असे ताकदीचे मंत्री एकत्र काम करत होते.

विरोध करणारा माणूस संपवण्याचे कारस्थान असतेच

राजकारण होते आणि ते असतेच. कुरघोड्या, शह-कटशाह असतातच. विरोध करणारा माणूस संपवण्याचे कारस्थान होत असतेच ते नेहरूंपासून होते. पण सक्षम स्वयंप्रज्ञ माणसांचे मोल जाणून त्यांना सन्मान आणि संधी देणे, ही संसदीय परंपरा होती. अगदी विरोधी पक्षांतील नेतेही परस्परांबद्दल आदर बाळगून होते. मग पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असोत की इंदिरा गांधी. मुख्यमंत्री विलासराव देशमुख असोत की मनोहर जोशी.

हे सुद्धा वाचा

 फडणवीस अनिष्ट राजकारणाचे वाहक झाले

जरा सक्षम आणि प्रभावी माणूस दिसला आणि तो पक्षाशी आपल्याशी निष्ठावंत असला, तरी असुरक्षित वाटून त्याचा गेम करायचा ही भारताच्या नव्या एकचालकानुवर्ती राजकारणाची प्रकृती झाली आहे. जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांना हा संसर्ग झाला आहे. देवेंद्र फडणवीस याच अनिष्ट राजकारणाचे वाहक झाले आणि अखेरीस बळीही ठरले! देवेंद्रांना ज्या पद्धतीने अवमानित व्हावे लागले, ते क्लेशकारक आहे. काल शपथ घेतानाचा त्यांचा चेहरा पाहून गलबलून आले. एका बुद्धिमान, मुत्सद्दी आणि तरुण नेत्याचा असा तेजोभंग होणे राजकारणाच्या या नव्या युगात स्वाभाविक आहे. हा नवा भारत आहे! सुमारांच्या सद्दीचा हा काळ आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.