Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, मी मंत्रीमंडळात नसेल

देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेटमध्येही नसणार आहेत. ही घोषणा फडणवीसांनीच केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारण फडणवीसांचा रोल काय असणार? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, मी मंत्रीमंडळात नसेल
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, मी मंत्रीमंडळात नसेलImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 5:05 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात घडीघडीला नवे ट्विस्ट येत आहे. कारण आजच राज्यपाल भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठी घोषणा केली आहे. भाजप आणि शिवसेना सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री असतील. तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेटमध्येही (Maharashtra Government Cabinet) नसणार आहेत. ही सुद्धा घोषणा फडणवीसांनीच केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारण फडणवीसांचा रोल काय असणार? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे या आमदारांनी आपला आवाज बुलंद केला. मी त्याला बंड म्हणणार नाही. हे अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे. असे सरकार दीर्घकाळ चालणार नाही हे मी सांगत होतो. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा राज्यापालांकडे दिला आहे. आमचे 106 आणि त्यांचे समर्थक आणि अपक्षांचं पत्रं आम्ही दिलं आहे. 7.30 वाजता शिंदे यांच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे. आज एकच शपथविधी होणार. त्यानंतर सर्व कार्यवाही करू, असेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

सरकारचा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडे

या नव्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांकडे असणार आहे हे आता निश्चित झालं आहे. भाजपचं संख्याबळ हे मोठं असल्याने फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेमुळे राज्याची राजकीय समीकरणं हि पूर्णपणे बदलून गेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा अजूनही शिवसेनेकडेच असणार आहे.

फडणवीसांचं राजकीय वजन वाढलं

भाजप आणि फडणवीसांचा शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सर्वात मोठी मास्टरस्ट्रोक तसेच फडणवीसांचं राजकीय वजन हे वाढवणारा आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या टिकेला हे थेट उत्तर असणार आहे. ही घोषणा करतानाच फडणवीसांनी महाविकास आघाडीवरही सडकून टीका केली आहे.

राज्याच्या राजकारणातला दुर्मिळ क्षण

राज्याच्या राजकारणात असा क्षण हा क्वचितच पाहायला मिळाला असेल. ज्या राजकीय पक्षाच्या जागा जास्त आहे, असा राजकीय पक्ष मुख्यमंत्रिपदापासून बाजुला होत दुसऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची प्रयोग झाला तो इतर राज्यातही होऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजपने त्यालाही मोठी शह दिला आहे.

शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना

शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. शिंदे हे शिवसेनेचे नेते. आमच्या मतदारसंघात हारलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचं असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची. ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यांचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा प्रश्न. त्यावर बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सराकर देऊ लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. असं मी वारंवार सांगत होतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.