अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च माहित नाही, आता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला. (Devendra Fadnavis BJP Maharashtra Bachao)

अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च माहित नाही, आता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 12:44 PM

मुंबई : केंद्राने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे 85 टक्के पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही, असा घणाघात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपने राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव आंदोलना’ची हाक देत ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं. (Devendra Fadnavis BJP Maharashtra Bachao Protest)

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बारा बलुतेदारांवरही संकट आलं आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु असल्याचं टीकास्त्र फडणवीस यांनी सोडलं.

“पवारांनी एखादं पत्र उद्धव ठाकरेंनाही लिहावं”

केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही का? आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? असा सवाल फडणवीसांनी विचारला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला.

केंद्राने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे 85 टक्के पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही, त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपची भूमिका घेऊन निवेदन दिल्याचं फडणवीस म्हणाले.

सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, असा दावाही फडणवीसांनी केला.

रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, एक डॅशबोर्ड बनवून, रुग्णालयातील जागा सांगू शकतो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल, आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही, असं ते म्हणाले. (Devendra Fadnavis BJP Maharashtra Bachao)

“सरकारला मदत करण्यास तयार”

आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको. आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

पायी जाणाऱ्या मजुरांना थांबवा या सूचना केल्या होत्या, मात्र जातात तर जाऊ द्या, आपलं संकट टळतंय अशी धारणा होती, मात्र या मजुरांना ट्रेन किंवा बसने पाठवलं जाऊ शकलं असतं, असंही फडणवीस म्हणाले.

परदेशात अडकलेल्यांना भारतात परतायचं आहे, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे विमानं उतरण्यास परवानगी नाही, लोक व्हिडीओ करुन पाठवत आहेत, त्यांचे हाल होत आहेत, विमाने उतरण्यास महाराष्ट्राने परवानगी द्यावी, त्यांना क्वारंटाईन करुन उपचार करता येतील, मात्र त्यासाठी निर्णयाची गरज आहे, निर्णय होत नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

(Devendra Fadnavis BJP Maharashtra Bachao)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.