Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस

सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. (Devendra Fadnavis On Lockdown Electricity Bill Hike)

Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 6:55 PM

मुंबई : नागपुरात लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचे बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. नागपुरात घडलेल्या धक्कादायक घटनेची बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ने दाखवली होती. या बातमीला ट्विटरवर कोट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. (Devendra Fadnavis On Lockdown Electricity Bill Hike)

“सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या ‘शॉक’मधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का?” असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

“कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा !” असे फडणवीस म्हणाले.

घराचं वीज बिल 40 हजार, नागपुरात व्यक्तीची आत्महत्या

नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. (Devendra Fadnavis On Lockdown Electricity Bill Hike)

संबंधित बातम्या : 

सुशांतच्या आत्महत्येइतकी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व्हावी, ते सुटतील तरी : राजू शेट्टी

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.