‘मल्टीस्टारर’ नव्हे, हा तर ‘हॉरर’ सिनेमा, फडणवीसांचं चव्हाणांना प्रत्युत्तर
महाविकासआघाडीचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, तर हॉरर सिनेमा आहे. जनतेला सध्या हाच हॉरर सिनेमा पाहावा लागत आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांना लगावला आहे (Devendra Fadnavis answer Ashok Chavan).
नांदेड : महाविकासआघाडीचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, तर हॉरर सिनेमा आहे. जनतेला सध्या हाच हॉरर सिनेमा पाहावा लागत आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांना लगावला आहे (Devendra Fadnavis answer Ashok Chavan). अशोक चव्हाण यांनी आमचं तीन पक्षांचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर फडणवीसांनी जोरदार टीका केली (Devendra Fadnavis answer Ashok Chavan).
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकासआघाडीचं सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, तर हॉरर सिनेमा आहे. जनतेला सध्या हाच हॉरर सिनेमा पाहावा लागत आहे. हा हॉरर सिनेमा जास्त वेळ चालणार नाही.”
सत्ता स्थापन करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून दिलं होतं का याचाही खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील होताना संविधानाच्या चौकटीत राहून काम करु असं पत्र सोनिया गांधींना लिहून दिल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
“शिवभोजन थाळी म्हणजे केवळ दिखाऊपणा आणि फसवेगिरी”
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीवरही सडकून टीका केली. शिवभोजन थाळी म्हणजे केवळ दिखाऊपणा आणि फसवेगीरी असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. ते म्हणाले, “12 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात केवळ 18 हजार लोकांना शिवभोजन दिलं जात आहे. त्यात आधारकार्ड तपासा, फोटो काढा हा गरीबांचा अपमान आहे.”