Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी वाढीव वीज बिलांवरुन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. (Devendra Fadnavis criticize Nitin Raut on electricity bills)

ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात: देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 8:06 PM

मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी वाढीव वीज बिलांवरुन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. (Devendra Fadnavis criticize Nitin Raut on electricity bills)

भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं माहिती गोळा केली. काही ठिकाणी शंभर पट, दोनशे पट वीज बील आली. झोपडीत राहणाऱ्यांना  50 हजारांची बीलं आली. वीज बील माफ करणार म्हणाले होते.मात्र, काल ऊर्जामंत्र्यांनी वीज  वापरली तर बील भरावे लागले, असे स्पष्ट केले. हा राज्य सरकारनं राज्यातील जनतेशी केलेला विश्वासघात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकारनं पहिल्यांदा घेतलेली भूमिका बदलली. राज्य सरकार यापूर्वी सवलत देणार म्हणाले होते. आता वीज बील भरावे लागणार म्हणतंय.  ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलांवरुन मागील सरकारवर टीका केली होती याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्यत्तर दिलं आहे.आमचे तेंव्हाचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखरखर बावनकुळे यांनी वीज कंपन्यांची बॅलन्स शीट सुधारली होती. केंद्र सरकराच्या चांगल्या वीज कंपन्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एका वीज कंपनीचा समावेश आमच्या काळात झाला.

आम्ही गरिबांकडून वीज बील वसूल केली नाही. मात्र, हे सरकार कोणालाही दिलासा न देता त्यांच्याकडून वसुली करत आहे. हे विश्वासघातकी सरकार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारची लक्तरं वेशीवर टांगण्याची वेळ आलीय

देशात सर्वाधिक कोरोना केसेस महाराष्ट्रात का? मुंबईत का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू मुंबई महाराष्ट्रात का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले त्याला जबाबदार कोण?

राज्य सरकारची लक्तरं वेशीवर टांगण्याची वेळ आलीय. कोरोनाची चिंता नव्हती, यांना कोरोनाच्या नावाखाली टेंडर न काढता कंत्राट देण्याची यांना चिंता होती, असा आरोप फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारनं कोरोना काळात बदल्या करा आणि माल कमवा, यानुसार बदल्या करुन बाजार मांडला. एका माणसाला चार चार जण फोन करत होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या कार्यकारिणीमध्ये केली.

संंबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

(Devendra Fadnavis criticize Nitin Raut on electricity bills)

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....