Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर रोजचीच बोंबा बोंब, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्ला

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना लस मोफत देण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय.

ही तर रोजचीच बोंबा बोंब, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्ला
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 8:05 PM

ठाणे : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना लस मोफत देण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. फडणवीस यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी केली. यावर केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता फडणवीस यांनी ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब असल्याचं म्हणत टीका केली. ते ठाण्यात बोलत होते (Devendra Fadnavis criticize Thackeray Government over free Corona Vaccine issue).

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे. महाराष्ट्राने देखील केंद्र सरकारची मदत घ्यावी. किमान गरीब आणि मध्यम वर्गाला ही लस मोफत द्यावी, अशी आमची मागणी आहे.”

केंद्र सरकार यासाठी राज्य सरकारला फंड देत नाही याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीसांनी ही रोजचीच बोंबा बोंब असल्याची टीका केली.

“कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी मागील वर्षी देखील या देवीच्या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडत असतात. एकिकडे मातेचा आशीर्वाद घेत असताना आपण मातांना शक्ती रुपी मानले आहे. कोरोना काळात मोठे संकट आले असताना भारतात नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण नियमांचं पाळन केलं. वेगवेगळ्या उपाय योजना आपण करत आलो.”

“कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रामध्ये बघितले. समाजाच्या अनेक क्षेत्रातून अनेकांनी कामे केली. जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रामध्ये 54 लाख लोकांपर्यंत शिधा वाटप करावे लागेल असं सांगितलं. त्यावर आपण काम केलं. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत आपण संकटाला तोड देत काम केलं. त्यामध्ये नवदुर्गांनी देखील चांगले काम केले. समाजात जे चांगले काम करतात त्यांचे कौतुक झाले पाहिजे. मी या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करतो. कोरोना काळात सेवा करणाऱ्या या आई चरणी कोरोना दूर होवो अशी प्रार्थना करतो. या आईची शक्ती घेऊन जोमाने काम करूयात,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

कोरोना लसीच्या नोंदणीसाठी CoWIN अ‍ॅप? केद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण इशारा

Corona Vaccine | काऊंटडाऊन सुरु, देशभरात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली

भाजपकडून कोरोना महामारीचा राजकीय वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis criticize Thackeray Government over free Corona Vaccine issue

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.