Devendra Fadnavis : ‘उत्तर नसतं तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो’, फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. 'जेव्हा कोणतंही उत्तर नसतं तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो', असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान पहिल्या दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडीतील नेते, मंत्री आणि आमदारांवर सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप आणि केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टीका केली जातेय. आयकर विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरही धाड टाकलीय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी सभागृहात भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात’, असं खुलं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. ‘जेव्हा कोणतंही उत्तर नसतं तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो’, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, ‘जेव्हा कोणतंही उत्तर नसतं तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो. भाजपने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढली. त्याचं कोणतंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही. म्हणून भावनिक भाषण केलं, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं आव्हानही फडणवीसांनी दिलंय.
‘..म्हणून त्यांनी भावनिक बोलणं पसंत केलं’
CM had absolutely no answer or reply to the serious corruption issues we raised during #MaharashtraAssembly Session. And so, he chose to speak like that.. आम्ही उपस्थित केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही उत्तर नव्हते.म्हणून त्यांनी भावनिक बोलणे पसंत केले! pic.twitter.com/KBWtxbCP1I
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 26, 2022
‘कुणाच्या कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही’
किरीट सोमय्या यांची कारवाई ही प्रतिकात्मक आहे. कुठलिही कारवाई ही संबंधित संस्था किंवा न्यायालय करते. भाजपची संघर्षाची भूमिका आहे. आम्ही कुठल्याही कारवाईने दबणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलतच राहणार, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिलाय. कुणाला कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही किंवा कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. कुठलीही संस्था कुणाचा नातेवाईक पाहून कारवाई करत नाही. तथ्यांच्या आधारावरच कारवाई होते, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.
त्याचबरोबर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आम्ही 2024 ला स्वबळावर सरकार स्थापन करणार. उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या वक्तव्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
म्हाला सत्ता पाहिजेत ना. सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात, असं खुलं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. मी तुमच्या कुटुंबाचे कधी भानगडी काढल्या? याचं शेपूट त्याला, त्याचे शेपूट त्याला जोडलं जातं आहे. एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी थोडसं भावनिक बोलतो. बाबरीच्या खाली राम जन्मभूमी होती. तसे कृष्णजन्मभूीच्या खाली काही तुरुंग असेल तर बघा. तिथे मला टाका. मी कृष्ण नाही. पण तुम्ही कंस बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
इतर बातम्या :