“पश्चिम बंगाल कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त, आता भगव्याचा बोलबाला सुरु” : देवेंद्र फडणवीस

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये डावे आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोठे वक्तव्य केले आहे. (devendra fadnavis west bengal election result 2021)

पश्चिम बंगाल कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त, आता भगव्याचा बोलबाला सुरु : देवेंद्र फडणवीस
devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 6:54 PM

मुंबई : देशात 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत.  या पाच राज्यांपैकी सर्वात जास्त चर्चेत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal election result 2021) भाजपचा पराभव झाला आहे. या राज्यात भाजपला 100 चा आकडा पार करता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीमध्ये डावे आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले. पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील भाष्य केले. (Devendra Fadnavis criticizes leftist and Congress over West Bengal election result 2021 said saffron wave began in Bengal)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

“पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झालाय. तेथे आता उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे काँग्रेसची काय अवस्था झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे काँग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे. मागच्या वेळी आमचा फक्त 3 जागांवर विजय झाला आहे. यावेळी 80 पेक्षा जास्त जागांवर आम्ही निवडून आलो आहोत, असे फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदी, अमित शाहांची लोकप्रियता कमी झाली असे नाही

तसेच पुढे बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी आमि भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लाढतीबद्दल भाष्य केले. “बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनासुद्धा निवडून येण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे फक्त बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची लोकप्रियता कमी झाली असे म्हणता येणार नाही. या पराभवाचे केंद्रीय नेते विश्लेषण करतील. आम्ही आसाममध्ये जिंकलो आहोत. पदुच्चेरीमध्ये जिंकलो आहोत,” असे  फडणवीस म्हणाले.

पंढरपुरातील विजय विठ्ठलाला समर्पित

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे हे 3733 मतांच्या आघाडीने निवडून आले. पंढरपुरातील याच विजयाबद्दल बोलताना “पंढरपुरात भारतीय जनता पक्षाला जनतेने निवडून दिलं. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून समाधान आवताडे परिचित आहेत. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक त्याच्यासोबत राहीले. भारतीय जनता पार्टी आणि सर्वजणांनी एकत्रित काम केले. या काळात आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. येथील बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा सरकारविरोधात नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला. हा विजय विठ्ठलाला समर्पित करतो,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी

उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख, निवडणूक जिंकल्याबद्दल अनोख्या शब्दात शुभेच्छा

West Bengal Election Results 2021 LIVE: ‘गड आला पण सिंह गेला’, ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव

(Devendra Fadnavis criticizes leftist and Congress over West Bengal election result 2021 said saffron wave began in Bengal)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.