‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं’, MIM च्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढलाय.

'हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं', MIM च्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 8:24 PM

नागपूर: एमआयएमने (AIMIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिलीय. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी (Balasaheb Thackeray) जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढलाय.

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, अशी जोरदार टोलेबाजीही फडणवीसांनी केलीय.

संजय राऊतांचा एमआयएमवर घणाघात

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांची छुपी युती आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे आणि हेच समीकरण राहणार आहे. यात बाकी कुणीही काही करु शकत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आहोत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भाजपची युती सर्वांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पाहिली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी एमआयएमवर जोरदार हल्ला चढवलाय.

जलील यांची महाविकास आघाडीला थेट ऑफर

एमआयएमचे औरंगाबादचे खासजार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला खुली ऑफर दिलीय. तुमचं तीन चाकाचं सरकार आहे. त्याला एक चाक जोडून चारचाकी बनवा, आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी दिलीय. जलील यांच्या या ऑफरनंतरच राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय.

इतर बातम्या :  

MIM ने भाजपाविरोधी असल्याचं सिद्ध करावं, Ncp च्या सुरात काँग्रेसचा सूर, MIM “अग्निपरीक्षा” देणार?

‘द काश्मिर फाईल्स’वरुन वाद सुरुच; आता संजय राऊतांकडून ‘बेळगाव फाईल्स’!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.