Devendra Fadnavis : त्यांचं हिंदुत्व गदाधारी नव्हे तर ‘गधा’धारी, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणविसांचं प्रत्युत्तर, राऊतांनाही टोला
'आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर 'गदाधारी' नावाचं नवहिंदुत्व उदयाला येत आहे. मात्र, रोज सकाळी राज्याची भीषण परिस्थिती पाहता त्यांचं हिंदुत्व 'गदा' नव्हे तर 'गधा'धारी असल्याचा प्रत्यय येतोट, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला. आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या याच वाक्याचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार पलटवार केलाय. ‘आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर ‘गदाधारी’ नावाचं नवहिंदुत्व उदयाला येत आहे. मात्र, रोज सकाळी राज्याची भीषण परिस्थिती पाहता त्यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी असल्याचा प्रत्यय येतोट, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. दादर येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
अमित शाह यांच्या कार्याचा गौरव
देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ हे पुस्तक त्यांच्या वाटचालीचा महत्त्वाचा आलेख आहे. भारतीय जनता पार्टीत एक सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होतो हे यानिमित्ताने समजते. अमित शाह यांचं व्यक्तिमत्त्व केवळ निवडणुकीतील जय-पराजयानं समजून घेता येत नाही. त्यांनी भाजपाची नव्याने केलेली शिस्तबद्ध बांधणी, पक्षात तळापर्यंत रुजविलेले संघाचे संस्कार, पक्षविस्तारासाठी केलेली देशभरची भ्रमंती, कार्यकर्त्यांशी सतत संवाद यांसारखे अनेक कंगोरे या पुस्तकातून लोकांसमोर आले आहेत. अनेकदा विरोधक अमित शहा यांना टार्गेट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कणखर आणि संवेदनशील अमित भाई विरोधकांना पुरून उरले. त्यांचे आधुनिक चाणक्य म्हणून होणारे कौतुक सार्थ ठरणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, चाणक्य आणि सावरकरांना ते प्रेरणा मानतात. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा संपूर्ण अभ्यास करून गुजराती भाषेत पुस्तक लिहिले असून ते लवकरच प्रकाशित होणार आहे. वरून कणखर वाटणारे अमित शहा कुटुंबवत्सल आहेत. भारतीय संगीताची त्यांना उत्तम जाण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Renowned actress #PallaviJoshi, LoP @mipravindarekar, Mumbai BJP President @MPLodha ji, @ShelarAshish, @BhatkhalkarA, @udaynirgudkar, Ramesh Patangej ji, authors of this book @anirbanganguly, Shivanand Dwivedi, Dr Jyostna Kolhatkar & other dignitaries were present.#BJP pic.twitter.com/aO9inwhsD1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 26, 2022
फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं
फडणवीस पुढे म्हणाले, 2014 मध्ये शिवसेनेसोबत युतीने लढायचं ठरवलं तेव्हा अमित शहा दीड महिना मुंबईत ठाण मांडून होते. त्याचाच प्रत्यय म्हणजे भाजपाने घवघवीत यश मिळवत शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा छोटा भाऊ हे मिथ्य बदलून टाकले. त्यावेळी महाराष्ट्राला मोठा भाऊ कोण हे अमित शहा यांच्यामुळेच समजले अशी खोचक टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याचे अनोखे कसब शाह यांच्याकडे असून समाजातील शेवटचा घटक या पक्षाचा केंद्रबिंदू असला पाहिजे यावर त्यांचा नेहमीच भर आहे. नव्या पिढीला शहा यांचा प्रेरणादायी प्रवास मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
At the book release of ‘Amit Shah Ani BhaJaPachi Vatchal’ (अमित शाह आणि भाजपाची वाटचाल), Marathi version of the book ‘Amit Shah and The March of BJP’ written by @anirbanganguly and Shivanand Dwivedi.#AmitShah #book #BJP https://t.co/8yHluD0Jtj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 26, 2022
काश्मीर फाईल्सच्या निर्मात्या पल्लवी जोशी, मूळ पुस्तकाचे लेखक अनिर्बान गांगुली, लेखिका डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर,जेष्ठ विचारवंत रमेश पतंगे, जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात, लोढा, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, मूळ पुस्तकाचे सहयोगी लेखक शिवानंद द्विवेदी, प्राची जांभेकर, सुहासराव हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
इतर बातम्या :