Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना…. शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तास्थापनेबाबात माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले.

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना.... शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तास्थापनेबाबात माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 8:13 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नव्हे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. या नव्या सरकारने नुकतेच आपल्या कारकिर्दीचे शंभर दिवस पूर्ण केले आहेत. यानंतर आता या सरकारच्या स्थापनेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा झाला आहे. सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis ) राज्यपालांना भेटलेच नाहीत असा दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले.

यानंतर राज्यात नवे शिंदे-फडवीस सरकार स्थापन झाले. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तास्थापनेसाठी कोणत्या तारखेस राज्यपालांना भेटले याची माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी मागविली होती.

यावर राजभवन कार्यालयाने उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत भेट झाल्याची नोंदच राजभवन दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

28 जुन 2022 रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या विवीध वृत्तपत्रात व न्युज चॅनेलवर प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानाही राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस भेटलेच नसल्याची माहिती दिली आहे.

यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा नितीन यादव यांनी केला आहे.

दुसरीकडे राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी ज्यांना निमंत्रण दिले होते. त्याची माहिती तसेच एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती राज्यपालांनी अद्यापही त्यांच्याजवळच वैयक्तिक राखुन ठेवली असून त्यांच्याच राजभवन कार्यालयासही उपलब्ध करुन दिली नसल्याचे यादव यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे ही माहिती राज्यपालांनी स्वतःजवळच ठेवण्याचे कारण काय? राज्यपालांना ही माहिती देताना नेमकी कशाची भिती वाटतेय हे वेगळे सांगायची गरज नसल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.