Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्जमधून डिस्चार्ज, पुढील 10 दिवस होम क्वारंटाईन
सेंट जॉर्जचे डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीसांना 10 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला
मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुढील दहा दिवस फडणवीस होम क्वारंटाईन असतील. (Devendra Fadnavis gets discharge from St George Hospital after treatment on COVID)
सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रीटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 10 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर ते राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली घसरल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 97 पर्यंत वाढली. गेल्या रविवार-सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीस यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लागण झाल्याचे समोर आले होते. अजित पवारांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सोडण्यात आले.
सरकारी रुग्णालयात उपचाराचा आग्रह
कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयांत उपचार घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर फडणवीस हे मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्यात आले.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, अशी माहिती ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी 24 ऑक्टोबरला दिली होती.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.(Devendra Fadnavis gets discharge from St George Hospital after treatment on COVID) माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
संबंधित बातम्या:
मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात न्या, महाजनांना सांगितल्याप्रमाणे फडणवीस सेंट जॉर्जमध्ये
देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हिरचा डोसही दिला, प्रकृतीत सुधारणा
(Devendra Fadnavis gets discharge from St George Hospital after treatment on COVID)