आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar) घेतली.

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात...
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 3:56 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राजू परुळेकरांनी फडणवीसांना जर तुम्हाला काही बदलायची संधी मिळाली तर तुम्ही काय बदलाल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी बदलाल का? असा प्रश्न विचारला. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Talk About oath ceremony with Ajit Pawar)

या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जीवनात अशा 100 घटना असतात, ज्या आपल्याला बदलल्या पाहिजेत असं वाटतं. पण त्या 100 घटना आपण बदलू शकत नाही. त्यामुळे हे बदलेन किंवा ते बदलेन हे निवडणं कठीण आहे.”

“जर संधी मिळाली तर माझ्या स्वत: मध्ये मला एक बदल करायचा आहे. कदाचित ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माणसाला एक महत्त्वाकांक्षा लागते आणि त्यासाठी एक Killer Instinct (काही तरी करुन दाखवण्याची वृत्ती) लागते. ती माझ्यात नाही. मला कपटी क्रूर व्हायचं नाही. तसा मी नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण मला नेहमी अस वाटतं की मला हे मिळवायचे आहे किंवा ते माझ्या जीवनात नाही. हे केवळ सत्तेसाठी नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी अल्पसंतुष्ट आहे. अल्पसंतुष्ट असण्याचे फायदेही असतात. मानसिक त्रास होत नाही. पण त्याचं नुकसान असतं. मी जे करु शकलो, तेही चांगलं करु शकलं. पण यापेक्षा चारपट करु शकतो,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

“मी पंतप्रधान होईन असं वाटत नाही. जेव्हा मी नगरसेवक, महापौर होतो, तेव्हा मी बदल केलेत. आमदार किंवा मुख्यमंत्री होतो, तेव्हाही मला जे करता आलं ते मी केलं. आता विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे आताही मला जे शक्य आहे ते करतो. जो रोल मला मिळाला किंवा जीवनात जी भूमिका मिळाली त्या भूमिकेला आपल्या क्षमतेप्रमाणे न्याय द्यायचा प्रयत्न करायचा,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Talk About oath ceremony with Ajit Pawar)

संबंधित बातम्या : 

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.