फडणवीस म्हणाले, घरची धुणी भांडी बाहेर नको, खडसे म्हणतात देवेंद्रजी उत्तम ड्रायक्लीनर!
घरची धुणी भांडी बाहेर काढू नका म्हणणारे देवेंद्र फडणवीस उत्तम ड्रायक्लीनर आहेत, असा घणाघात खडसेंनी केला. (Eknath Khadses attack on Devendra Fadnavis)
जळगाव : “गैरसमज मी नाही तर देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. MIDC जमीन मी नाही, जावयाने खरेदी केली. सातबाऱ्यावर आजही मूळ मालकाचे नाव आहे. MIDCचे नाही. मी कुठे भ्रष्टाचार केला हे सांगा”, अशी आक्रमक विचारणा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. घरची धुणी भांडी बाहेर काढू नका म्हणणारे देवेंद्र फडणवीस उत्तम ड्रायक्लीनर आहेत, ते सर्वांना क्लीन चीट देतात, असा घणाघात खडसेंनी केला. (Eknath Khadses attack on Devendra Fadnavis)
उच्च न्यायालायने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं.
जमीन बायकोने, जावयाने खरेदी केली, पण देवेंद्रजी म्हणतात खडसेंनी केली. चार वर्षांपासून मी विधानसभेत विचारत होतो की भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावे द्या. मी कुठे भ्रष्टाचार केला हे सांगा असा फडणवीसांकडे आग्रह केला. कोणता भ्रष्टाचार केला हे सभागृहाला सांगा, अशी मागणी केली. कारण गंभीर आरोप घेऊन मला बाहेर जायचं नाहीय, हे सभागृहात सांगितलं. भाजप नेत्यांकडे मागणी केली, चंद्रकांत दादांकडे पुरावे दिले. पार्टीकडे न्याय मिळत नसेल तर जनतेच्या दरबारात जाण्यात गैर काय, असा सवाल खडसेंनी केला.
घरची धुणी भांडी बाहेर काढू नका असं देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे. कारण ते उत्तम ड्रायक्लिनर आहेत, त्यांनी अनेक मंत्र्यांना क्लीन चीट दिली आहे. आरोप झाले की लगेच क्लीन चीट. ते बाहेर वगैरे काही करत नाहीत. आला की क्लीन चीट, आला की क्लीन चीट, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांचं बरोबर मी घरची धुणी भांडी बाहेर करत नाही. पण मला पर्याय काय? मी चार वर्षांपासून भूमिका मांडतोय, पण तुम्हाला एकदाही नाथाभाऊंचं म्हणणं, त्यांचे पुरावे का पाहू वाटले नाहीत? माझी चर्चेला नेहमीच तयारी राहिलेली आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
(Eknath Khadses attack on Devendra Fadnavis)
संबंधित बातम्या
MIDC जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ, फडणवीसांचा पलटवार
अमृता फडणवीसांनी व्यवहार केल्यास देवेंद्रजींच्या पदाचा गैरवापर होतो का? खडसेंचा हल्लाबोल