Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, शिंदेही जाण्याची शक्यता, अमित शाहांची भेट घेऊन स्ट्रॅटेजी काय ठरवणार?
Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन स्ट्रॅटेजी ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती. सत्तेचा फॉर्म्यूला देखील बनला असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय.
मुंबई : विरोधी पक्षनेते आणि राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा दिल्लीला गेले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन स्ट्रॅटेजी ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील घडामोडींना वेग आलाय. पुढील 48 तासांत बंडखोर शिंदे (Ekanth Shinde) हे मुंबईत येण्याची शक्यता आहे. राज्यपालांना शिंदे गटाकडून किंवा छोट्या पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता नेमकं काय घडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Political Crisis) वर्तुळाचं लक्ष लागलंय. तर चहुकडे हिच चर्चा आहे. बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येणार असल्यानं वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्ली गेल्यानं सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत
Former CM Devendra Fadnavis leaves for Delhi, he likely to meet union minister Amit Shah & other leaders to chalk out the plan for new govt formations in Maharashtra.@NewIndianXpress @TheMornStandard
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) June 28, 2022
अमित शाह-फडणवीस-शिंदेंमध्ये चर्चा?
लवकरच राज्यात नवं सत्तासमीकरण पहायला मिळू शकतं. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी तातडीनं दिल्लीला गेल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात सत्तास्थापना, मंत्रीमंडळाचा नवा फॉर्म्याला, यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सत्तेचा नवा फॉर्म्यूला काय?
बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून सरकार बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सत्तेचा फॉर्म्यूला देखील बनला असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय. तो फॉर्म्यूला काय आहे. हे जाणून घ्या..
सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात शिंदे गटाला काय?
- शिंदे गटाला भाजपची ऑफर
- उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिदेंना
- आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद
- पाच आमदारांना राज्य मंत्रीपद
सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात भाजपला काय?
- देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद
- भाजपचे 29 आमदार मंत्री बनतील
- अपक्ष आमदारांनाही मंत्री पदे
आमदारांना हजर राहण्याचे आदेश
एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे.आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
भाजपकडून सत्तास्थापनेची तायरी?
भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.