कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी, उदयनराजेंनंतर फडणवीसांची पियुष गोयलना विनंती
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे
मुंबई : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता (Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal) भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनींही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे (Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal).
देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले?
“मी याआधी आपल्याशी याविषयावर संवाद साधला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की निर्यातबंदी तात्काळ उठवावी. महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना योग्य भावही मिळतो. निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी हताश, निराश झाले आहे. मी आशा करतो की तुम्ही लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्याल”, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी या पत्रातून पियुष गोयल यांना केली.
My letter to Union Minister Hon @PiyushGoyal ji requesting to lift ban on onion exports. pic.twitter.com/fD4xAleCfF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2020
भाजप नेत्यांकडून केंद्र सरकारला बंदी उठवण्याची मागणी
भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनीही कांदा निर्यातीवरील बंदी त्वरित उठवावी अशी मागणी केली. पियुष गोयल यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली (Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal).
त्यापूर्वी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही भाजप सरकारला घरचा अहेर दिला. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पत्रक काढून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आपल्याच मोदी सरकारला पत्र लिहित कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे.
कांदा निर्यातबंदीवरुन उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर, पियुष गोयल यांना पत्रhttps://t.co/XH7BgAzehk@Chh_Udayanraje #onionexportban
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 16, 2020
Devendra Fadnavis Letter To Piyush Goyal
संबंधित बातम्या :
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची विनंती
मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र