नागपूर : रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Devendra Fadnavis makes serious allegations against Mahavikas Aghadi government)
पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेतील रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. चौकशी झाल्यास अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ज्यांनी सहकार चळवळीत चुकीचं काम केलं. सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती आहे. मात्र, ज्यांनी सहकार श्रेत्रात चांगलं काम केलं, त्यांनी या नव्या खात्याचं स्वागतच केल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री अमित शाह हे खूप आधीपासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाल्याचं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केली. “काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी पदावर गेल्यावर किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे. तसेच त्या पदाची उंची वाढवण्यासाठी काम करावं. आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत नाही. एकमत असतं असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती.”
Video | रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी Devendra Fadnavis यांचे गंभीर आरोप @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #RiceScam #Maharashtra
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/r94r0drziI
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या :
भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला
Devendra Fadnavis makes serious allegations against Mahavikas Aghadi government