पुन्हा येईन म्हणालो होतो! मी पुन्हा आलोच पण शिंदेंना सोबत घेऊन आलो- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : पुन्हा येईन म्हणालो होतो! मी पुन्हा आलोच पण शिंदेंना सोबत घेऊन आलो, असं फडणवीस म्हणाले.

पुन्हा येईन म्हणालो होतो! मी पुन्हा आलोच पण शिंदेंना सोबत घेऊन आलो- देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 12:37 PM

मुंबई : मी पुन्हा येइन, मी पुन्हा येईन (Me Punha Yein), असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं अन् ही कविता त्यांच्या नावासोबत जोडली गेली. त्यावरून कधी त्यांच्या कॉन्फिडन्सचा दाखल दिला गेला तर कधी त्यांना हिणवल गेल. आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात त्यावर भाष्य केलं. पुन्हा येईन म्हणालो होतो! मी पुन्हा आलोच आणि शिंदेंना सोबत घेऊन आलो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते, असं फडणवीस म्हणालेत.

एकनाथ शिंदे वेगळं रसायन-फडणवीस

एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन आहे. 24X7 काम करणारा हा नेता आहे. निवडणूक असते, क्राईसिस असतो तेव्हा 72X21 असं तिहेरी वेळा काम करताना हा नेता दिसतो. एकनाथ शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. सगळ्यांसाठी धावून जाणं, ही शिकवण धर्मवीर आनंद दिघे यांना दिली. ज्याचा कुणी नाही, त्याचे दिघे साहेब होते. याच शिकवणीमुळे ते सामान्य माणसासाठी काम करताना शिंदेसाहेब दिसतात.

सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो. शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. कर्मावर अढळ निष्ठा असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. ते जनतेचे सेवेकरी आहे, कुशल संघटक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये शिवसेनेत सक्रिय काम सुरु केलं. शाखाप्रमुखापासून ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये किसन नगर शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर दिघेसाहेबांच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलनात शिंदेंनी सहभाग घेतला, असंही फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सीमाप्रश्नावर जे आंदोलन झालं, त्या आक्रमक आंदोलनात शिंदे यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा तयार केला. 1986 साली त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये सीमाप्रश्नी त्यांनी कारावास भोगला. त्यातून एक मोठं व्यक्तिमत्त्व तयार झालं, असं म्हणत त्यांनी फडणवीसांनी शिंदेंच्या व्यक्तीमत्वाची पायाभरणीची कशी झाली ते सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.