“राहुल गांधींचा ‘तो’ विचार गाडल्याशिवाय राहणार नाही!”, देवेंद्र फडणवीस आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना इशारा दिलाय. वाचा...
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत विधान केलंय. त्याला आता कडाडून विरोध होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय.”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, अशा शब्दात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय.
सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. ज्या विचारांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, तो विचार आम्ही मरु देणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.
हिंगोलीत राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करणारं विधान केलं आणि आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रा करतात. हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
रणजीत सावरकर तक्रार करणार
राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे.सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर पोलिसात तक्रार करणार आहेत. मुंबईतील दादर पोलीस स्टेशनमध्ये रणजीत सावरकर तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळेदेखील उपस्थित असणार आहेत.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
सावरकरांचं देशासाठीचं योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.