उद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन उचलला नाही : फडणवीस

उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं म्हटलं. तो आमच्यासाठी मोठा धक्का होता, असं फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी माझा एकही फोन उचलला नाही : फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 08, 2019 | 6:04 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी कित्येक वेळा फोन केला, मात्र त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर अक्षरशः हल्लाबोल (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray) चढवला.

ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा अपेक्षापेक्षा काही जागा कमी आल्या. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं म्हटलं. तो आमच्यासाठी मोठा धक्का होता, असं फडणवीस म्हणाले.

खरंतर जनतेने महायुतीला कौल दिला होता. अशा स्थितीत त्यांनी अशी भूमिका का घेतली हे आम्हाला समजलं नाही. दुसरीकडे मी पहिल्याच पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरेंचेही आभार मानले होते, असंही फडणवीसांनी सांगितलं.

माझ्यासमोर एकदाही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणी झाली नसल्याचं मी दिवाळीदरम्यान अनौपचारिक गप्पांमध्ये बोललो होतो. मी आणि प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही विचारलं. मात्र, असं काही बोललं नसल्याचंच ते म्हणाले. यात जे काही गैरसमज झाले ते आपआपसात चर्चा करुन सोडवणे शक्य होतं. कोणाला खोटं पाडण्याचा प्रश्नच येत नव्हता. मात्र, आम्ही चर्चाच करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली, असं फडणवीसांनी (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray) सांगितलं.

सेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद न ठरल्याचं शाहांकडूनही मान्य : फडणवीस

मागील 5 वर्षात उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध राहिले. या पुढील काळातही राहतील. राजकारण आपल्या आपल्या जागेवर आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करुन मार्ग काढले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही, याचं मला दुःख नाही. मात्र, आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करायला शिवसेनेला दररोज दिवसातून तीन-तीनदा वेळ मिळायचा, याची खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार होत होता. आता त्यांचं नेमकं काय ठरलं आहे, याची कल्पना नाही. मात्र, त्यांनी पहिल्या दिवसापासून भाजपशी चर्चा न करता काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करण्याचं धोरण केलं, ते योग्य नाही. त्यांच्या आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांनी जी वक्तव्ये केली त्यामुळे त्यांना माध्यमांमध्ये जागा नक्कीच मिळेल. मात्र, आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आम्हाला अशी टीका करता येत नाही, त्यांच्या भाषेत उत्तर देता येत नाही असं समजू नये. आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक आक्रमकपणे उत्तर देऊ शकतो. मात्र, आम्ही तोडणारे नाही तर जोडणारे लोक आहोत. विधानसभा निवडणुकीत तर नाहीच पण मागील 5 वर्षात देखील उद्धव ठाकरे यांच्यावर कधीही टीका केली नाही. मात्र, त्यांच्याकडून आमच्या वरिष्ठ नेत्यांवर खालच्या स्तरावर टीका करण्यात आली. केंद्रातही सरकारमध्ये राहायचं आणि राज्यातही सरकारमध्ये राहायचं तरी त्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर टीका करायची हे आम्हाला मान्य नाही, हे योग्य नाही, असं फडणवीसांनी ठणकावलं.

जगाने ज्या मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं त्यांच्यावर टीका करण्याचं काम आमच्या विरोधीपक्षांनीही केलं नाही ते आमच्या मित्रपक्षांनी केलं. आमचं म्हणणं हेच आहे की आपण सोबत राहणार असू तर अशाप्रकारची टीका, शब्द मोदींबद्दल वापरणं सुरुच राहणार असेल, तर अशा प्रकारचं सरकार का चालवायचं? असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray) उपस्थित केला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.