विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलणार का? फडणवीस हसून म्हणाले…
विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसतं, पण परिणाम नक्कीच पाहायला मिळेल, असं फडणवीस म्हणाले
नागपूर : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत (Nagpur Graduate Constituency Election) मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election and Maharashtra Politics)
“महाराष्ट्रात सर्वच विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला चांगलं समर्थन मिळालं आहे. त्यामुळे निकालानंतर चांगलं यश प्राप्त होण्याचा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते. या परीक्षेत आम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ, असा विश्वास आहे. विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसतं, पण त्याच्यावर परिणाम नक्कीच पाहायला मिळेल” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
“सुशिक्षित सुजाण मतदारांनी लोकशाही मजबूत केली पाहिजे. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा” असं आवाहन फडणवीसांनी केलं.
तुमच्या घरचीच तीन नावं मतदार यादीत नाहीत, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, की “इतकी अचानक निवडणूक घोषित झाली. मतदार याद्यांमध्ये घोळ दिसत आहे. बरीच नावं सापडलेली नाहीत. बऱ्याच घरांमध्ये फॉर्म सर्वांनी भरले, पण दोघांचे नाव यादीत आहे, दोघांचे नाव नाही, असे आढळले. निवडणूक आयोगाला यंत्रणेत सुधारणा करावी लागेल. फॉर्म परिपूर्ण भरण्याची जबाबदारी आम्ही घेतली, निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव येण्याची जबाबदारी घ्यावी” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
नागपूर पदवीधर मतदारसंघ
नागपूर पदवीधर मतदारसंघात 322 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. नागपूर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडूनही नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना संधी देण्यात आली आहे. (Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election and Maharashtra Politics)
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/Qpo5AgLYwv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या :
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची धामधूम, मतदानापूर्वी पंकजा मुंडे ‘आयसोलेट’
पदवीधर निवडणूक : विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवाराची भेट, मतदाना दिवशीच्या भेटीने भुवया उंचावल्या
चुरस आहे पण विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच!- चंद्रकांत पाटील
(Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election and Maharashtra Politics)