‘हजारो तरूणांना रोजगार मिळणार’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
सध्या रोजगाराचा प्रश्न वाढत चालला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
नागपूर : सध्या रोजगाराचा (Youth Employment) प्रश्न वाढत चालला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येत्या आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. तरूणांना नोकरभरतीत प्राधन्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
देशातील दहा लाख तरूणांना रोजगार देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे 75 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत, असं फडणवीस म्हणालेत. ते नागपुरात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 10 लाख तरूणांची नोकर भरती होणार आहे. तसंच 75 हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.
अतिशय संघर्षातून आम्हाला आजचा दिवस पहायला मिळत आहे. आम्ही छोट्याशा खेड्यातून आलोय. मात्र पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने नियुक्तीपत्र मिळतोय याचा आम्हाला आनंद आहे. एवढ्या उमेदवारातून आमची नियुक्ती झाली याचा आम्हाला आनंद होतोय, अशा भावना या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांनी केला व्यक्त केल्या आहेत.
या रोजगार मेळाव्यात सोलापूर विभागाच्या विविध भागात भरती झालेल्या 218 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये नांदेड, अमरातावतीसह उत्तर प्रदेशातील उमेदवारांची सोलापूर विभागात नियुक्ती झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळावा संपन्न होणार आहे.