भंडारा : शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या (Narendra Bondekar) गळ्यात भाजपाचं उपरणं पहायला मिळालं. त्यांनी भंडाऱ्यामध्ये (Bhandara) भाजपाच्या (BJP) वतीने आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. शिंदे समर्थक आमदार नरेंद्र बोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी नरेंद्र बोंडेकर यांनी भाजपाचे उपरणे परिधान केले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात बोंडेकरांचे कौतुक केले. यानंतर आता राजकीय चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना फडणवीसांनी लोकप्रतिनिधींचे चांगलेच कान टोचले आहेत. काही लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात, मात्र लोकप्रतिनिधी हे प्रत्यक्षात जनतेचे सेवक असतात. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर लेखाजोखा मांडाण्याची गरज असते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या कार्यक्रमात बोलताना पुढे फडणवीस यांनी म्हटलं आहे की, भंडारा -गोंदियासाठी निधी कमी पडू देणार नाही. भंडाऱ्यातील विकास कामे मार्गी लावले जातील. भंडारा -गोंदियात पर्यटन वाढवण्याचा सरकाराच प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसोबत होणारी बेमाई आमचं सरकार कदापी सहन करणार नाही, भंडारा जिल्हयात धान हे मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांचं धान खरेदी झालं पाहिजे. ते नुसतं खरेदीचं करायचं नाही तर ते वेळेत खरेदी झालं पाहिजे असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावाने जे व्यापारी धान विक्री करतात त्यांना देखील आळा घालण्यासाठी पाऊले उचलणार असल्याचं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच धान खेरदी करणाऱ्या बोगस संस्थांवर कारवाईचा इशारा देखील यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.