“डोकं बिघडल्यासारखा बोलतो, त्याला…”, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार काय?

या मेळाव्यातील भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर जोरदार टीका केली. आता या टीकेला देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

डोकं बिघडल्यासारखा बोलतो, त्याला..., देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार काय?
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 4:50 PM

Devendra Fadnavis on Uddhav thackeray : महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. सध्या सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातील भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर जोरदार टीका केली. आता या टीकेला देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

“आपण काय उत्तर देणार?”

उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात जगत आहेत आणि त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जे काही समोर येतंय, त्याची योग्य ती चौकशी करु”

यापुढे देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझे यांच्या आरोपाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, सचिन वाझेंनी जर मला पत्र पाठवलं असेल तर मी ते अद्याप पाहिलेलं नाही. मी पण माध्यमांद्वारे ही बातमी पाहिलेली आहे. मी नागपुरात आहे. त्यामुळे मला याबद्दल काहीही कल्पना नाही. त्यामुळे मी याबद्दल काही पत्र आलं आहे का, त्यात काय लिहिलं आहे, हे पाहून मी त्याबद्दल प्रतिक्रिया देईन. पण जे काही समोर येत आहे, त्याबद्दल योग्य चौकशी आम्ही करु, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील., माझ्यापायाशी कलिंगड ठेवलं. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.