देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; पाच दिवसांत कोरोनावर मात
आज फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोरोनावर (Corona) मात केली आहे. आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कोरोना चाचणी (Corona test) निगेटिव्ह आली. पाच जून रोजी फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांनी आज कोरोनावर मात केली. फडणवीस यांना पाच जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कोणी आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन फडणवीस यांनी केले होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपले सर्व राजकीय दौरे रद्द केले. आज पाच दिवसानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
दरम्यान फडणवीस यांना यापूर्वी देखील एकदा कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात केली. फडणवीस यांच्या या कृतीचं तेव्हा राज्यभरातून कौतुक झालं होतं. त्यानंतर फडणवीस यांना पुन्हा एकदा पाच जून रोजी कोरोनाची लागण झाली. यावेळी फडणवीस यांनी रुग्णलयात न जाता घरीच उपचार घेत कोरोनावर मात केली. आज पाच दिवसानंतर फडणवीस यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.
पुन्हा कामाला सुरुवात
देवेंद्र फडणवीस हे भाजपामधील महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाकडून त्यांच्यावर अनेकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या राज्यात राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी आपले सर्व राजकीय दौरे रद्द केले होते. मात्र आता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्ये अटीतटीचा सामना पहायला मिळत आहे.