आवडता बंगला, शिंदेंची झोप, गृहखातं, राग-सहनशीलता अन् राशीभविष्य, पाहा फडणवीस काय-काय बोलले…

दिवाळीनिमित जाणून घ्या फडणवीसांची राजकारणा पलीकडची बाजू...

आवडता बंगला, शिंदेंची झोप, गृहखातं, राग-सहनशीलता अन् राशीभविष्य, पाहा फडणवीस काय-काय बोलले...
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 3:53 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस (Devendra Fadnavis) यांची राजकीय वक्तव्य चर्चेत असतात. पण आज तुम्हाला फडणवीसांबाबतच्या राजकारणापलीकडच्या बाबी समजतील. सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीनिमित्त (Diwali 2022) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.

दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारीक बातचीत केली. तेव्हा त्यांनी आवडता बंगला, शिंदेंची झोप, गृहखातं, राग-सहनशीलता अन् राशीभविष्य अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

आवडता बंगला

देवेंद्र फडणवीसांचा आवडता बंगला कुठला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फडणवीसांनी त्याचं उत्तर दिलं आहे. मला सागर बंगला आवडतो. इथं मी खूश आहे. हा बंगला खूप पॉझिटिव्हीट आहे, असं फडणवीस म्हणालेत.

शिंदेंची झोप

‘मुख्यमंत्री शिंदे केव्हा झोपतात, हा खरंतर संशोधनाचा विषय’, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झोपेवर फडणवीसांनी भाष्य केलंय.

गृहखातं

गृहखात्याबाबतही फडणवीस बोलते झाले. राज्यमंत्री लवकर केले नाहीत तर त्रास हा होतोच. डोक्यावरचे केस गेले तरच समजायचं की गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलंय, असं फडणवीस म्हणालेत.

राग-सहनशीलता

तुम्हाला राग येतो का? असा प्रश्न विचारल्यावर फडणवीसांनी आपलं मत मांडलं. मला तेव्हाच राग येतो जेव्हा मला खूप भूक लागलेली असते, असं फडणवीस म्हणाले. माझ्याकडे खूप सहनशीलता आहे, गेल्या 25 वर्षांत तुम्ही पाहिलंच असेल, असं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.

राशीभविष्य

तुम्ही कुठला दिवाळी अंक वाचता असं विचारल्यावर, ज्या दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलेलं असतं, तोच दिवाळी अंक मी वाचतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.