महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये बहुमताचं भाजप सरकार येईल, असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. गोव्याला पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार मिळालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये बहुमताचं भाजप सरकार येईल, असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजप नेते देखील यावेळी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील देखील यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मला अतिशय आनंद आहे की भाजपचं सरकार आलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. अतिशय स्थिर, स्टेबल सरकार आलेलं आहे. गोव्यात स्थिर आणि पुरोगामी विचाराचं सरकार आलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजप बहुमताचं सरकार असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत यांना महत्त्व देण्याची गरज नाही
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही, असं म्हटलंय. तर, तुम्हीही वेळ खराब करू नका आणि माझाही वेळ वाया घालवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संजय राऊत यांना इतकं महत्त्व का देता ? ते सरकारचे प्रतिनिधी आहेत का?, विश्ववेत्ते आहेत का? संजय राऊत यांच्या विचारांना सुप्रीम कोर्टानं कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं म्हटलंय, तुम्ही माझा वेळ खराब करु नका आणि तुमचाही वेळ खराब करु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाहा व्हिडीओ
नरेंद्र मोदी यांचं व्हिजन पुढं न्यायचंय
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी शपथविधीनंतर संवाद साधला असता ते म्हणाले की विकासासाठी सर्वांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पुढे घेऊन जायचं आहे. पंतप्रधान मोदी आज शपथविधी सोहळ्याला आलेत खूप आनंद झाला. आम्हाला काही अपक्ष आणि मगोपचा पाठींबा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत, गोव्यात कोण आलं त्यावर नाही बोलणार, असं देखील प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत
Devendra Fadnavis said BJP will form government in Maharashtra with full majority