Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी जाता जाता घेतलेले निर्णय अवैध पण, फडणवीसांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ठाकरे सरकारवर बोट
एकनाथ शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Sarkar) सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले हे निर्णय अवैध ठरतात, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं. तसंच उद्धव ठाकरेंनी घेतलेने निर्णय अवैध असले तरीही त्यातील बरेच निर्णयांशी आम्ही सहमत आहोत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील मोठ्या सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, असंही स्पष्ट केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आघाडी सरकारच्या कामावर ताशेरे ओढताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आघाडीने विकासाची कामे केली नाही. भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारात जेलमध्ये जाणं ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरुंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. रोज सावरकर हिंदुत्वाचा अपमान. ठिक आहे. शेवटच्या दिवशी संभाजी नगर झालं. पण कधी. राज्यपालांचं पत्रं आल्यावर कॅबिनेट घ्यायची नसते. तरीही कॅबिनेट घेऊन संभाजीनगर धाराशीव दिबा पाटील हे निर्णय घेतले. अर्थात हे निर्मय आमच्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहे. कारण ते वैध मानले जाणार नाही. पण ते आम्ही घेऊ..’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र फडणवीस यांनी आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘ शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही पूर्णपणे माझी जबाबदारी असेल. या शिंदे सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतंय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.