सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, मनसेसोबत जाणार नाही : देवेंद्र फडणवीस
तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे जातील त्यावेळी आम्ही पर्याय देऊ,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. | Devendra Fadnavis MVA Govt
सोलापूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे. शिवेसना खासदार संजय राऊत टीका करण्याशिवाय दुसरं काय करणार, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadanvis criticize MVA Govt)
राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षकमतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अवकाळी पाऊसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत, निसर्ग चक्रीवादळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई, निसर्ग चक्रीवादळ आणि वाढीव वीजबिलांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. (Devendra Fadanvis criticize MVA Govt)
पुणे पदवीधर मतदरासंघातून चंद्रकांत पाटील दोनवेळा निवडून आलेत. ही जागा आम्ही जिंकू हा आम्हाला विश्वास आहे. राज्य सरकारच्या विरोधात पदवीधर आणि शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे, तो मतदानात परावर्तित होईल. सध्या येथून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. पुणे शिक्षकमधून शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना भाजपनं पाठिंबा दिला आहे, दोन्ही उमेदवारांना विजयी करावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadanvis criticize MVA Govt)
वाढीव वीजबिलाच्या संदर्भात सरकारनं घुमजाव केले आहे. राज्य सरकारनं पलटी मारली आहे. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. अतिवृष्टीमुळं सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदी काठावरील ऊसासह सर्व पिकांचं मोठं नुकसान झालं. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणाला काही मिळालं नाही. फळबागांना कोणतिही मदत देताना दिसत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
अनैसर्गिक युतीचा भोग सर्वसामान्य जनता भोगतेय
महाविकास आघाडीच्या सरकारकडे वर्षपूर्तीनिमित्त काहीही सांगण्यासारखं नाही. तीन पक्षांचे पायपोस एकमेंकांच्या पायात नाहीत. सोलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी महाआघाडीचे सर्वोच्च नेते सुशीलकुमार शिंदे यांना ते विसरले. तिन्ही पक्षांच्या अनैसर्गिक युतीचा भोग सर्वसामान्य जनतेला भोगायला लागतोय, असा आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला आहे. (Devendra Fadanvis criticize MVA Govt)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शरद पवारांविषयी काय बोलले त्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतात. मात्र, पवारसाहेबांबद्दल काय बोलले की निवडक भाग घेऊन टीका करतात. चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्यासाठी तो विषय संपल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले.
महावितरणच्या थकबाकीबद्दल पाहिजे ती चौकशी लावावी तोंडावर पडतील. 20 वर्षातील प्रकरणांची चौकशी करावी. तीन वर्ष सातत्यानं दुष्काळ असल्यामुळं शेतकऱ्यांची वीज कापली नाही. आम्ही सावकारी प्रवृत्तीचे नाही, तुम्ही सावकारी करुन वीजबिल वसूल करत आहात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. (Devendra Fadanvis criticize MVA Govt)
शिवसेनेचा मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाhttps://t.co/DEqXEoR2v7@KiritSomaiya @OfficeofUT @ShivSena @PratapSarnaik #ED #EDRAIDS
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संबंधित बातम्या :
Devendra Fadnavis | आपला मित्र बेईमान निघाला, देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका
जे वातावरण देशात आहे तेच महाराष्ट्रात, इथेही भाजप निवडून येईल: देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadanvis criticize MVA Govt)