Devendra Fadnavis : शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार; देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत आश्वासन

Devendra Fadnavis : शक्ती कायदा सध्या राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. राज्याने केलेला कायदा हा सक्षम आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या कायद्यातील काही मुद्द्यांसंदर्भात माहिती मागितली आहे. तो अहवाल पोलीस महासंचालक तयार करत आहेत.

Devendra Fadnavis : शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार; देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत आश्वासन
शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार; देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत आश्वासनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 12:04 PM

मुंबई: भंडारा जिल्ह्याती एका महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्यात येत आहे. मात्र, अत्याचार पीडित महिलेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत काहीच आठवत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. तसेच कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नये यासाठी शक्ती कायदा (shakti law) तयार करण्यात आला आहे. राष्ट्रपतींकडे हा कायदा मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या कायद्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी मी स्वत: दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी आज विधान परिषदेत भंडाऱ्यातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली.

भंडारा जिल्ह्यात महिला अत्याचाराची घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी आहे. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासून या प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिला मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून प्राथमिक मदत देण्यात आली आहे. या प्रकरणात लाखनी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील पीएसआय आणि एएसआय यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच महिला एलपीसीवर कारवाई करण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एसआयटीकडून तपास सुरू

या प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली असून कसून तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस आणि वैदयकीय व्यवस्थेचं संवेदीकरण( sensitization) पुन्हा एकदा केलं जाईल. संबंधित यंत्रणांनी एसओपीचं पालन करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती मागवली

शक्ती कायदा सध्या राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. राज्याने केलेला कायदा हा सक्षम आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या कायद्यातील काही मुद्द्यांसंदर्भात माहिती मागितली आहे. तो अहवाल पोलीस महासंचालक तयार करत आहेत. शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी मी स्वतः दिल्लीला जाऊन पाठपुरावा करेन. अशा घटना घडू नयेत तसंच घटना घडल्या तर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांचं वागणं संवेदनशील असावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महिलेवर उपचार सुरू

दरम्यान, सामूहिक अत्याचाराची बळी ठरलेल्या महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील 18 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही पीडित महिला वेळोवेळी बयाण बदलवत असल्याने ती मनोरुग्ण असल्याचा अंदाज उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

31 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मुंडीपार/ सडक येथील पोलीस पाटील वर्षा शेंडे यांनी डायल 112 वर फोन करून 35 ते 37 वर्षे वयोगटातील एक महिला बेवारस स्थितीत फिरत असल्याची भंडारा लाखनी पोलिसांना माहिती दिली होती. दरम्यान 112 चे चालक बोंद्रे यांनी मुंडीपार / सडक येथे जाऊन या महिलेला लाखनी पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र रात्री पोलिसांना नजर चुकवून ती ठाण्यातुन निघून गेली. 1 ऑगस्ट रोजी तिच्यावर कारधा पोलीस ठाण्याचे हद्दीत कन्हाळमोह शेतशिवारात 2 नराधमांनी पाशवी अत्याचार केला. त्यानंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्या नराधमांना अटक केली. तसेच पीडित महिलेस उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठवण्यात आले. पण प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचाराकरिता तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.