उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरता का होईना विरोधकांची दखल घेतली याचा आनंद: फडणवीस

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही. विरोधकांसोबत केवळ एकच बैठक घेतली. | Devendra Fadnavis

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरता का होईना विरोधकांची दखल घेतली याचा आनंद: फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 3:56 PM

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt)

ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे, हे आमचे काम आहे. सरकार मनमानी कारभार करणार असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही. जनतेच्या आमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यांची दु:ख आणि प्रश्न मांडणे, हे आमचे काम असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही. विरोधकांसोबत केवळ एकच बैठक घेतली. त्या बैठकीलाही आम्ही सर्व नेते उपस्थित होतो, तर उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर असल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते.

तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून कोरोनाच्या काळात राज्यात सुरु असलेल्या राजकारणाविषयी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी एकदा या भाजप नेत्यांना समज द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

‘कुरघोडीच्या राजकारणात जनता भरडली जातेय, विधानपरिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटतील’

महाविकासआघाडीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. कोरोनाच्या काळात राज्य सरकारची निष्क्रियता दिसून आली. ग्रामीण भागात अतिवृष्टीनंतर जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. तर वीजबिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरुनही सरकारने माघार घेतली. सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे हे घडत आहे. एक वर्षाच्या काळात सरकारने केवळ विकासकामांना स्थगिती दिली, ठोस असे काहीच केले नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सरकारविरोधातील रोष दिसून येईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

संंबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे प्रशासनासाठी जन्मले नाहीत; शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही: चंद्रकांतदादा

‘अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल’, सरनाईक प्रकरणावरुन जयंत पाटलांचं भाजपला प्रत्युत्तर

मुंबै बँक घोटाळ्याची चौकशी सुरु, सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती; आम्ही चौकशीला घाबरत नाही, प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

(Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.