Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, फडणवीसांची जळजळीत टीका

शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यामुळे शिवसेनेने भगव्या झेंड्याचा अपमान केला आहे. | Devendra Fadnavis

शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, फडणवीसांची जळजळीत टीका
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 11:38 AM

नागपूर: स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा, त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशा जळजळीत शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. भगवा झेंडा हा आता शिवसेनेचा राहिलेला नाही. शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यामुळे शिवसेनेने भगव्या झेंड्याचा अपमान केला आहे, असे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. (Shivsena BJP clash over saffron flag)

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारपासून नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सुरु केला. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. चीनची मदत घेऊन काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणू, अशी भाषा करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी घाणेरडे लिखाण केले, त्यांच्यासोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. त्यामुळे आता भगवा तुमचा राहिलेला नाही. सामान्य जनतेला वीज बिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरून सरकारने घूमजाव केले. शेतकऱ्यांनाही वीज बिलात सूट मिळणार नाही. हा मुद्दा आम्ही प्रचारात उचलून धरू, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस सरकारच्या काळात महावितरण डबघाईला आल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. आमच्या सरकारच्या काळात उर्जा विभागाने उत्तम काम केले. आमच्या काळात थकबाकी असेल, याचा अर्थ आम्ही गरिबांना सवलत दिली आहे. एकदा तुमच्या सरकारने काय केले आणि आम्ही काय केले, हे समोरासमोर येऊन स्पष्टच करुयात, असे थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

तर नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपकडेच राहील, असा दावाही त्यांनी केला. नागपूर हा भाजपचा आणि नितीन गडकरींचा बालेकिल्ला आहे. महाविकासआघाडी सरकारने पदवीधर आणि शिक्षकांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नागपूर मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला “तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला.

“आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे. कोणीही आमच्या भगव्याविषयी बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल, तर राख व्हाल” असा इशारा संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी भाजपला दिला.

संबंधित बातम्या:

‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर…’ शिवसेनेचा भाजपला इशारा

ठाकरे सरकारचा माज उतरवणार; मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली

(Shivsena BJP clash over saffron flag)

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.