Devendra Fadnavis: पुन्हा एकदा उलटफेर, देवेंद्र फडणवीस शिंदेंचे उपमुख्यमंत्री होणार, दिल्लीतून जेपी नड्डांची घोषणा

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची माहिती जे. पी. नड्डा यांनी दिलीय. नड्डा यांनी ट्वीटकरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार हाकलेले देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis: पुन्हा एकदा उलटफेर, देवेंद्र फडणवीस शिंदेंचे उपमुख्यमंत्री होणार, दिल्लीतून जेपी नड्डांची घोषणा
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 7:56 PM

मुंबई : एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. इतकंच नाही तर आपण सत्तेबाहेर राहून हे सरकार व्यवस्थित चालेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. ‘मी बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र, आता भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी (J. P. Nadda) आताच फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असा आग्रह केला. त्यामुळे भाजपमध्ये विसंवाद निर्माण झालाय का? असा सवाल विचारला जात असतानाच, देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याही माहिती जे. पी. नड्डा यांनी दिलीय. नड्डा यांनी ट्वीटकरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार हाकलेले देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री (Deputy CM) असणार आहेत.

अमित शाह यांचेही ट्वीट

फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा – नड्डा

आम्ही पदासाठी नाही, तर विचारासाठी आहोत. विचारांना पुढे नेत असताना राज्याचा विकास व्हावा, राज्यातील जनतेचा विकास व्हावा, लोकांच्या इच्छा, मागण्या पूर्ण होवोत. या सर्व गोष्टींचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी हा विचार केला आहे. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद लावावी आणि महाराष्ट्र एक विकसित राज्य होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

 

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.