Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!

विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. फडणवीसांच्या या व्हिडीओ बॉम्बनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब असल्याचं बोललं जात आहे!

फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!
देवेंद्र फडणवीस, प्रवीण चव्हाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 5:07 PM

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण (Pravin Chavan) यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिला आहे. फडणवीसांच्या या व्हिडीओ बॉम्बनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब असल्याचं बोललं जात आहे!

फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी प्रवीण चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवीण चव्हाण हे माध्यमांशी बोलणं टाळत असल्याचं पाहायला मिळालं. आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी चव्हाण यांना तब्बल 30 वेळा फोन केला. चव्हाण यांनी एकदा फोन घेतला मात्र प्रश्न ऐकून त्यावर उत्तर देणं टाळलं, त्यानंतर मात्र त्यांनी फोन घेणं बंद केलं. इतकंच नाही तर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयाला टाळं असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे चव्हाण हे माध्यमांसमोर आपली बाजू मांडणं का टाळत आहेत? असा सवाल आता विचारला जातोय.

‘व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल’

दरम्यान, काल प्रवीण चव्हाण यांनी आपला कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया दिली होती.

फडणवीसांनी अध्यक्षांना पेन-ड्राईव्ह दिला

देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

उद्धवजी, तुमचं-आमचं नसेल जमत ते सोडून द्या, पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल: देवेंद्र फडणवीस

गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू, तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा

हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.