CORONA | फडणवीसांच्या दौऱ्यांचा सरकारला धसका, प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हालचाली!
फडणवीसांचे हे कोरोना दौरे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray covid pandemic)
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर कोरोनाचा आढावा घेत दौरे केले. गेल्या एक महिन्यापासून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांश भागात कोरोनाच्या स्थितीची पाहणी केली. त्यानंतर आता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत कोरोना स्थितीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण, सत्ताधाऱ्यांनी फडणवीसांच्या दौऱ्यांवरुनच टीकेची झोड उठल्याचं चित्रं आहे. त्यामुळं फडणवीसांचे हे कोरोना दौरे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray covid pandemic)
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरे करत कोरोनाचा आढावा घेतला. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद अशा प्रमुख शहरांसह जवळपास सर्वच विभागात फडणवीसांनी प्रत्यक्ष भेटी देत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
देवेंद्र फडणवीसांनी 6 मे 2020 रोजी मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन कोरोनास्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला
त्यानंतर 23 जूनला देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौरा करत, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला कोविड उपचार आणि सुविधाचा आढावा घेतला. यावेळी आकडे कमी दाखविण्याच्या नादात टेस्टिंग प्रोटोकॉल पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर 24 जूनला फडणवीसांनी सोलापूर दौरा करत कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शासनाच्या योजनांचा फायदा रुग्णांना मिळत नसल्याचा आरोप केला. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray covid pandemic)
? Aurangabad | औरंगाबाद Reviewed coronavirus pandemic situation at Divisional Commissioner office, Aurangabad. I appeal GoM to pay attention towards shortage of healthcare workers, need of extensive testing, loot of patients by private hospitals. pic.twitter.com/qJHKOFIOlM
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 9, 2020
तर पुढे 29 जूनला फडणवीसांनी अमरावती आणि अकोल्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी क्वारंटाईन सेंटर आणि कोरोना वार्डची पाहणी करत सरकार गोंधळलेलं असल्याची टीका केली.
त्यानंतर 4 जुलैला पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा करत फडणवीसांना सरकारवर ताशेरे ओढले. तर 6 जुलैला ठाण्याचा आढावा घेत कोरोना स्थितीवरुन सरकारवर हल्ला चढवला.
8 जुलैला उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगावात फडणवीसांनी कोरोनाचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी 9 जुलैला जळगाव आणि औरंगाबादचा दौरा करत फडणवीसांनी सरकारला कोंडीत पकडलं
फडणवीसांच्या याच झंझावती दौऱ्यांचा सत्ताधारी महाविकास आघाडीनं धसका घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यावर सत्ताधारी नेते जोरदार प्रहार करताना दिसत आहे. कधी सामनातून तर कधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्ताधारी पक्ष फडणवीसांच्या दौऱ्यांवर टिप्पणी करत आहे. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray covid pandemic)
?Jalgaon | जळगाव On day 2 of this tour, we visited #COVID19 hospital in Jalgaon & reviewed #coronavirus pandemic situation with Collector and officials at Collector office. LoP Pravin Darekar,Girish Mahajan, MP Rakshatai Khadse,other leaders joined me in these visits & meetings. pic.twitter.com/qi4Y1khTVG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 9, 2020
विशेष म्हणजे, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर विरोधक कोरोना काळात हेल्थ टुरिझम करत असल्याचा टोला लगावला होता. त्यावर फडणवीसांनी नया है वह म्हणत, आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोरोनावरुन चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचं चित्रं आहे.
इतकचं नव्हे तर फडणवीसांनी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यभरातील दौऱ्यासंदर्भात चर्चेचा प्रस्ताव ठेवला.
त्यामुळे एकंदरीत एकीकडे सत्ताधारी नेत्यातंर्गत कुरबुरी आणि कोरोनाच्या चक्रव्युहात अडकले आहेत. त्यात फडणवीस आणि दरेकरांच्या दौऱ्यांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे आता फडणवीसांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे.
?Malegaon | मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. #CoronaInMaharashtra pic.twitter.com/41TU5GAfks
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार-उद्धव ठाकरे किंवा मग बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या चर्चांमधून विरोधकांच्या डाव परतवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना काळातील फडणवीसांचं हे चक्रव्युह उद्धव ठाकरे कसं भेदतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray covid pandemic)
संबंधित बातम्या :
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला 20 जागा, आता जयंत पाटील म्हणतात..