मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सूचक ट्वीट करत दोनच शब्दात टोले लगावले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) लस घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Devendra Fadnavis young nephew Tanmay Fadnavis gets Corona Vaccine Jitendra Awhad takes dig on Social Media)
देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “धन्यवाद तन्मय!” या दोनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धन्यवाद तन्मय!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 20, 2021
सोशल मीडियावर प्रश्न
येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु त्याआधीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली, हा प्रश्न विचारला जात आहे. तन्मय यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक नाही, ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत, मग त्यांना कोरोनाची लस कशी मिळाली, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. चाचा विधायक है हमारे या प्रसिद्ध विनोदी सीरीजच्या नावावरुनही काही जणांनी टीका केली आहे.
कोण आहेत तन्मय फडणवीस?
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे
माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू
अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन
(Devendra Fadnavis Tanmay Fadnavis)
काँग्रेसचा हल्लाबोल
“45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आला आहे.
“तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता जनतेच्या प्रश्नावर फडणवीस मौन सोडणार का, हा सवाल विचारला जात आहे.
संबंधित बातम्या :
‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?
PHOTO | वयाचे निकष पूर्ण करण्याआधीच कोरोना लस? ‘अभिनेता’ पुतण्या फडणवीसांना अडचणीत आणणार?